आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशीही माणुसकी:माकडिणीने नाकारलेल्या पिल्लाला डिस्कव्हरी चॅनलचे व्हिडिओ दाखवून ‘माकडपणा’चे धडे!

नागपूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नागपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या कर्मचाऱ्यांना लागला पिल्लाचा लळा

आईपासून दुरावलेल्या एका पिल्लाला माकडिणीने नाकारले. बराच वेळ वाट पाहूनही माकडीण न आल्यामुळे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी या पिल्लाला परत आणले. आता या पिल्लाला डिस्कव्हरी चॅनलवरील व्हिडिओ दाखवून माकडासारखे वागण्याचे धडे दिले जात आहेत. माकडाचे हे पिल्लू लोभसवाणे असून कर्मचाऱ्यांना त्याचा लळा लागलेला आहे. हे पिल्लू सर्व शिकले की त्याला जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी दिली.

आईपासून दुरावलेल्या या पिल्लाला माकडिणीने न्यावे म्हणून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे कर्मचारी जंगलात घेऊन गेले. परंतु माकडिणीने पिल्लाला न घेताच जंगलात धूम ठोकली. खूप वेळेपर्यंत वाट पाहूनही माकडीण न आल्याने कर्मचारी पिल्लाला परत घेऊन आले. कर्मचारी त्याची आईसारखी काळजी घेत आहेत.

जंगलात आईकडून जे शिकते, ते पिल्लास शिकवण्याचा प्रयत्न

जंगलात पिल्लू आईकडून जे काही शिकते, ते त्याला शिकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पिल्लाला माकडांचे वेगवेगळे व्हिडिओ दाखवून जंगलात माकडे कशी वागतात, कसे आवाज काढतात हे दाखवणे सुरू आहे. त्याला पिल्लू चांगला प्रतिसादही देत आहे. सध्या हे पिल्लू थोडे अशक्त आहे.

कर्मचाऱ्यांना बिलगून राहते पिल्लू

व्हिडिओ बघताना या पिल्लाचे हावभाव पाहाण्यासारखे आहेत. त्याच्या खोड्या व वागणे लहान बाळासारखे आहे. माकडाचे पिल्लू जसे माकडिणीला चिकटून बसते, तसेच ते कर्मचाऱ्यांना बिलगून राहते. आवारातील झाडावरही त्याला सोडण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...