आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची चातकासारखी वाट:नागपूरसह विदर्भात रविवारपासून मान्सून; उकाड्यापासून तूर्तास दिलासा नाही

नागपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनपूर्व पाऊस सरी काेसळत असताना नागपूरसह विदर्भात अजूनही गर्मी आणि उकाडा आहे. त्यामुळे वैदर्भीय पावसाची चातकासारखी वाट पाहात आहे. पंचांगानुसार विदर्भात 21 जूनपासून पाऊस आहे.

प्रादेशिक हवामान खात्यानुसार विदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत म्हणजे 19 पासून पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. वटसावित्री म्हणजे 14 जूनपासून दुपारपर्यत ऊन आणि दुपार नंतर पाऊस असे वातावरण आहे. पण, अजूनही पाऊस आलेला नाही. उकाडा आणि गर्मीमुळे वैदर्भीय हैराण झाले आहे.

प्रादेशिक हवामान केंद्रानुसार नैऋत्य मान्सून बुधवार 15 जून 2022 रोजी मराठवाडा, संपूर्ण कर्नाटक आणि रायलसीमा आणि तामिळनाडू, किनारपट्टीच्या आंध्र प्रदेशातील काही भाग, वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे.

सध्या पेरणी नको

विदर्भ आणि तेलंगणाच्या काही भागात, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर, ओडिशाचा काही भाग, गंगेचा पश्चिम बंगाल, झारखंड, संपूर्ण उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि आणखी काही भागांमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढील 2-3 दिवसांत बिहारमध्ये मान्सून सक्रिय होईल. तथापि खूप चांगला पाऊस आल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...