आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आत्महत्या:नागपुरात अंबाझरी तलावात मायलेकीची आत्महत्या, कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा अंदाज

नागपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कौटुंबिक वादातून त्यांनी जीवन संपवल्याची प्राथिमक माहिती पुढे आली आहे.

अंबाझरी तलावात मायलेकीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सविता राजू खंगार (वय 45) व रूचीता राजू खंगार (वय 20) ही आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहे. श्वेतल राजू खंगार हीने दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील आणि काकांच्या कौटुंबिक वादातून आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आत्महत्या केलेल्या सविता खंगार यांची मोठी मुलगी शीतल खंगार हिने सांगितले की, मध्यरात्रीच्या सुमारास तिची आई आणि धाकट्या बहिणीने वाथोडा येथील विद्यानगरातील घरातून बाहेर पडल्या. दरम्यान त्या तलावाच्या दिशेने जात होत्या. यानंतर शीतलने त्यांचा पाठलाग केला. शीतलने आई आणि बहिणीला थांबवण्याचा प्रयत्नही केला मात्र त्यांनी ऐकले नाही. दरम्यान थोरल्या मुलीला काही कळण्याच्या आतच सविता आणि रुचिता या मायलेकींनी तलावात उडी घेतली आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी जीवन संपवल्याची प्राथिमक माहिती पुढे आली आहे.