आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूरतेचा कळस!:दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईवर कुऱ्हाडीने हल्ला; महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आईवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. सदरील हा प्रकार गुरुवारी रात्री घडला. यात गंभीर जखमी झालेल्या अनुसया गंगाराम निकुरे यांच्यावर नागपूर येथील मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.

काय आहे घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी बोरी पोलिस ठाण्यातंर्गत टाकळघाट येथे वैशाली सुभाषराव कोकुडे ही तिची बहीण सोनु व तिच्या मुलाबाळांसह दिवाळीरीता माहेरी आई-वडीलांकडे टाकळघाट येथे आली होती. घटनेच्या दिवशी वैशाली बहीण सोनु व तिची आई गप्पागोष्टी करीत स्वयंपाक खोलीत बसले होते. त्यावेळी दारू पिण्याचे व्यसन असलेले वडील शिवशंकर गंगाराम निकुरे हे तिथे आले. शिवशंकर निकुरे यांनी त्यांची आई अनुसया गंगाराम निकुरे हीला दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या शिवशंकर यांनी आईच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या अनुसया निकुर यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी वैशाली कोकुडे यांच्या दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून शिवशंकर निकुरे यांना अटक करण्यात आली आहे.

खुनाच्या आरोपीला जन्मठेप

जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. देशमुख यांनी खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद उर्फ गोलु समलीखराम शाहु (वय 32) याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 मे 2021 रोजी आरोपी प्रमोद उर्फ गोलु समलीखराम शाहु (वय 32) व मृतक निरंजन उर्फ गोलु अग्नु वर्मा (वय 30) हे दोघेही एकाच वस्तीत राहत होते व एकमेकांचे मित्र होते. घटनेच्या दिवशी प्रमोद उर्फ गोलु समलीखराम शाहु याने निरंजन उर्फ गोलु अग्नु वर्मा याला त्याच्या घरी बोलावले.

गुन्हा दाखल

तिथे दोघांत वाद झाला. यात चिडलेल्या प्रमोद शाहु याने निरंजन उर्फ गोलु अग्नु वर्मा याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार करून त्याला जखमी केले. व तिथून पळून गेला. जखमीला घरच्यांनी नागपूर येथील मेयो हाॅस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. त्यावरून कलम 302 नुसार खूनाचा गुन्हा दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...