आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाशिम:खासदार भावना गवळी यांची आमदार राजेंद्र पाटणीला जीवे मारण्याची धमकी

वाशिमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार भावना गवळी यांनी भाजप आमदार रांजेद्र पाटणी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आमदार पाटणी यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज(दि. 26) जानेवारी रोजी नियोजन भवन येथील जिल्हा कार्यकारिणीची सभा होण्यापूर्वी खासदार भावना गवळी आणि भाजपा जिल्हाध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटणी या दोघांचा वाद झाला. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यादन, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद निवळला पण, बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौक येथिल सर्व दुकाने बंद केली. तसेच खासदार भावनाताई गवळी यांच्या फोटोचे दहन करून निषेध नोंदवला. सध्या शहरात पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. आमदार पाटणी यांनी धक्काबुक्की व अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे.

बातम्या आणखी आहेत...