आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विधानसभेतील एलएक्यू म्हणजे आमदारांसाठी ब्लॅकमेलिंग आणि पैसे उकळण्याचे साधन असल्याचे वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांना लोकशाहीच मान्य नाही, त्यामुळे लोकशाहीवर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. आमदारांना ‘जलील’ करण्याचा त्यांना अधिकार नाही, असे मत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बाेलताना केले. पटोले म्हणाले, एक आमदार, लोकप्रतिनिधी त्याच्या कार्यकाळात आपल्या मतदारसंघात कामे करण्यासाठी झटत असतो. हे करताना त्यांना घरावरही तुळशीपत्र ठेवावे लागते. मतदारसंघातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, जनसामान्यांचे प्रश्न ते विधानसभेत मांडून आपली कामे करवून घेण्याचा सतत प्रयत्न करत असतात. त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणाऱ्याचा मी निषेध करतो, अशा व्यक्तीचा धिक्कार करतो. त्यांच्या पाहण्यात एखादा आमदार असा आलाही असेल, तर ते त्यांनी त्यांच्यापुरतेच मर्यादित ठेवायला पाहिजे. सरसकट आमदारांबद्दल असे बोलणे योग्य नाही, असे पटोले म्हणाले.
इम्तियाज जलील स्वतः ब्लॅकमेलिंग करत असतील, तर त्यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे. त्यांचे हे वक्तव्य लोकशाहीसाठी घातक आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारचे संबंध कसे आहेत, हे कुणापासूनही लपलेले नाही. राज्य सरकारकडे पैशांची चणचण आहे. केंद्र सरकारकडून पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे पंतप्रधान ग्रामसडक योजनेची कामे आणि इतरही बरीच कामे रखडलेली असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.