आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपासोबत युतीत लढवणार:खासदार कृपाल तुमाने यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती

नागपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे यांनी विदर्भातील संघटना बळकट करण्यासाठी पदाधिकारी नेमले. ते अधिक बळकट करण्यासाठी नवरात्रात विदर्भातील नागपूर आणि अमरावती येथे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मेळावे आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार कृपाल तुमाने यांनी पत्रपरिषदेत दिली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपासोबत युतीत लढवणार असल्याचे तुमाने यांनी सांगितले. नवरात्रात शिवसेनेबाबत मोठा धमाका करणार असल्याचा दावा शिंदे गटाचे किरण पांडव यांनी केला.

भाजपासोबत आमचे सर्व ठरलेले आहे. या बाबत राज्यस्तरीय पत्रपरिषदेत याची माहिती देण्यात येईल, असे तुमाने म्हणाले. आमचीच शिवसेना ओरिजनल आहे. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. महिनाभरात निवडणूक आयोगाचा निकाल येईपर्यंत वाट पाहा असे ते म्हणाले.

120 जागा लढवणार

मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला नक्कीच न्याय मिळेल असे ते म्हणाले. अनंत चतुर्दशीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होईल अशी माहिती तुमाने यांनी दिली. नागपूर महानगरपालिकेत भाजपासोबत 120 जागा लढविणार असल्याचे ते म्हणाले.

समीकरण बदल्याची शक्यता

शिंदे शिवसेनेच्या या निर्णयामुळे नागपूर महानगरपालिका निवडणूकीत घमासान होणार आहे. महापालिकेत उद्धव ठाकरे गटाची तशीही ताकद नाही. येथे त्याचे दोन नगरसेवक आहेत. भाजपासोबत अजून मनसेची युती झालेली नाही. ती झाल्यास समीकरण आणखी बदलू शकतात.

भाजपला मार्ग सुकर

सध्या महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. काँग्रेस दोन नंबरवर आहे. तर राष्ट्रवादी नगण्य आहे. शिंदे शिवसेना सोबत आल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मार्ग सुकर होईल असे चित्र आहे. मनसेची युती झाल्यास मनसेला फायदाच होईल. कारण त्यांचा एकही नगरसेवक नाही.

सामान्य शिवसैनिक नाराज

येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे विदर्भातील संघटना मजबूत करण्यावर भर देणार हे ते घेत असलेल्या निर्णयावरून दिसून येते आहे. उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील शिवसेना वाढीकडे नेहमीच दुर्लक्ष केले. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात नाराजी होती. सामान्य शिवसैनिक नाराज होता. त्याचा फायदा शिंदे सेनेला होईल.

बातम्या आणखी आहेत...