आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदाराला कोरोना:खासदार नवनीत कौर राणा यांची प्रकृती बिघडल्याने अमरातीवरून नागपूरला हलवले; नुकतीच झाली कोरोनाची लागण

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पती रवी राणा यांच्यासह कुटुंबातील 12 जणांना झाली कोरोनाची लागण

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. खासदार नवनीत कौर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यानंतर त्यांना अमरावतीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असतानाच नवनीत कौर यांची प्रकृती बिघडली. त्यांना आता नागपूरच्या ओखार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खासदार नवनीत कौर राणा, त्यांचे पती रवी राणा यांचा कोरोनाचा अहवाल 6 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. यानंतर कुटुंबातील एकूण 12 जणांना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले. यामध्ये नवनीत कौर यांच्या मुलांसह सासू सासऱ्यांचा देखील समावेश आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे पाहता त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील केल्या होत्या. तसेच गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि स्वतःला आयसोलेट करावे असे आवाहन त्यांनी केले होते.

जवळपास संपूर्ण राणा कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सर्वसामान्यांसह दिग्गज नेत्यांकडून त्यांच्या आरोग्याची कामना केली जात आहे. माडजी अभिनेत्री नवनीत कौर राणा अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. तर नवनीत कौर यांचे पती तसेच युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून आमदार आहेत.

बातम्या आणखी आहेत...