आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंचे संतुलन पूर्ण बिघडले:नवनीत राणांची टीका, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदेंच

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संतुलन पूर्ण बिघडले आहे. दसरा मेळाव्याच्या त्यांच्या भाषणातून हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले, अशी टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

फक्त शिंदेंविरोधात राग

नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणात केवळ एकनाथ शिंदेंविरोधातील राग, द्वेष दिसून येत होता. त्यांनी स्पष्टपणे तसे बोलूनही दाखवले. उद्धव ठाकरे अनेक ठिकाणी अडखळत होते. केवळ 'बाप चोरला, बाप चोरला', असेच उद्धवजी म्हणत होते. मात्र, उद्धव व आदित्य ठाकरे हे केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या मालमत्तेचे वारस आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत.

उद्धव यांनी विचार करावा

नवनीत राणा म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे एकनाथ शिंदेच पुढे नेत आहेत. त्यामुळेच त्यांच्यासोबत 40 आमदार गेले आहेत. उद्धव ठाकरेंनी याबाबत विचार करावा. बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची लावून एकनाथ शिंदेंनी भाषण केले. त्यामुळे सर्व राज्यातून लाखो शिवसैनिक शिंदेंचे विचार ऐकण्यासाठी बीकेसीवर जमले होते.

फक्त मातोश्रीवर बसून राहतात

नवनीत राणा म्हणाल्या, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कधीही मातोश्रीबाहेर निघाले नाहीत. केवळ फेसबूकच्या माध्यमातून कामे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, ती आश्वासने ही पाळली नाहीत. आता एकनाथ शिंदे सर्वांना भेटून त्यांची कामे करत आहेत. तेच बाळासाहेबांचे वारसदार शोभतात.

अडीच वर्षे हिंदुत्व आठवले नाही

आमदार रवी राणा यांनीही उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर टीका केली. रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस व राष्ट्रवादीची काँग्रेसची विचारधारा मांडली आहे. आता शिवसेना हातातून जात असल्यामुळे त्यांना हिंदुत्वाची आठवण येत आहे. सत्तेत असताना अडीच वर्षे त्यांना हिंदुत्व आठवले नाही. त्यामुळेच सच्च्या शिवसैनिकांनी त्यांना झटका दिला.

बातम्या आणखी आहेत...