आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती:आगामी काळात एमएसएमई करील भारतीय अर्थव्यवस्थेचे नेतृत्व : केंद्रीय मंत्री गडकरी

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंडो-ऑस्ट्रेलियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ँड वुमन इनोव्हेटरशी साधला संवाद

आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेचे नेतृत्व एमएसएमई क्षेत्र करेल. विमा, निवृत्तिवेतन आणि समभाग अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि विमा क्षेत्रात गुंतवणूक खुली झाल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांशी संवाद साधताना दिली. ऑटोमोबाइल क्षेत्र आणि एमएसएमई भारतीय अर्थव्यवस्थेचे विकास इंजिन आहेत, असेही ते म्हणाले. रस्ते पायाभूत विकास आणि एमएसएमईत व्यापार गुंतवणूक आणि सहकार्यावरील इंडो-ऑस्ट्रेलियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ँड वुमन इनोव्हेटर या संस्थेशी संवाद साधताना ते बोलत होते.

देशात निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा आणि सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योगांच्या क्षेत्रात परकीय गुंतवणूक करा, असे आवाहनही गडकरींनी केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे रस्ते सुरक्षा क्षेत्रात यापूर्वीचेच सहकार्य आहे. या सहकार्यामुळे लोकांसाठी रस्ते सुरक्षा आणि जागरूकता अभियान राबवण्यात येत आहे. भारतीय रस्ते सुरक्षा मूल्यमापन कार्यक्रमांतर्गत २१ हजार किमी रस्त्यांचे मूल्यांकन करण्यात आले असून, सुमारे ३ हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे तांत्रिक उन्नतीकरण केले जात आहे. जनजागृतीमुळे या सुधारणा शक्य झाल्या आहेत, असेही गडकरी म्हणाले.

रस्ते सुरक्षा जनजागृती आणि उन्नतीकरणामुळे रस्त्यांवरील अपघातात ५० टक्के घट होईल. २०३० पर्यंत शून्य रस्ते अपघाताचे आमचे लक्ष्य असल्याचे गडकरी म्हणाले. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी रस्ते विकास मंत्रालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमासाठी जागतिक बँक आणि एडीबीने ७ हजार कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. सामाजिक जागरूकता आणि शिक्षण, आपत्कालीन सेवांमध्ये सुधारणा, वैद्यकीय विम्यावर अधिक भर, रुग्णालयाच्या सेवा अधिक उपलब्ध करणे यामुळे रस्ता सुरक्षेचे लक्ष्य गाठण्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत.

बातम्या आणखी आहेत...