आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या नावाखाली मनपाची लुट:ठाकरे सरकरने कोविड काळात मुंबई मनपाला लुटले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. यानंतर आज त्यांच्याकडील डायरी प्रकरण समोर आले आहे. यात मातोश्रीला पैसै दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

24 महिन्यात 38 मालमत्ता कशा?
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच सांगितले होते, की 24 महिन्यात 38 मालमत्ता जाधवांनी घेतल्या होत्या. दोन वर्ष कोविड होता, पण कोविडच्या नावावर मुंबई महानगरपालिकेला कसे लुटले जात आहे, हा आरोप आम्ही केला होता. आम्ही जे म्हटले होते ते आता खरं ठरत आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

‘मातोश्री’ म्हणजे नेमके कोण?
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराचे नावही मातोश्री आहे. यामुळे जाधवांनी ठाकरेंना काही पैसै पाठवले का, त्यांच्यात काही व्यवहार झाला आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. मात्र, यशवंत जाधव यांनी सदर दावे फेटाळले असून, आपल्या आईला या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. आईच्या वाढदिवसाला घड्याळ भेट दिले होते, तर गुढीपाडव्याला 2 कोटी रुपये दानधर्म करण्यासाठी आईला दिल्याचा खुलासा जाधव यांनी केला आहे.

यशवंत जाधव आहेत कोण?

यशवंत जाधव हे शिवसेनेचे नेते आणि मुंबई मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याबाबत एक डायरी उघडकीस आली आहे. 2018 ते 2022 च्या दरम्यान घडी आणि दोन कोटी रुपयांच्या लेनदेणीचा उल्लेख आहे. या डायरीत 50 लाख रुपयांची घडी आणि दोन कोटी रुपये मातोश्रीला देण्यात आल्यासंदर्भात लिहिण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुंबईतील बांद्रा येथे मातोश्री नावाचे घर आहे. नवीन वर्षात गिफ्ट वाटण्यासाठी हे दोन कोटी रुपये दिले गेल्याचा आरोप आता किरीट सोमय्या यांनीही केला आहे. तर यशवंत जाधव मातोश्री म्हणजे माझी आई, अशी सारवासारव करत आहेत. जवळपास महिन्याभरापूर्वी आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित इतर ठिकाणी छापे टाकण्यात आले. मुंबईतल्या एकूण 33 ठिकाणी विभागाने शोध घेतल्याचे देखील सांगितले होते. भायखळा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या आमदार आहेत.

बातम्या आणखी आहेत...