आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नागपूर:महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंकडून स्मार्ट सिटीच्या ‘सीईओ’चा कार्यभार काढला

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागपूर महापालिकेत आयुक्त विरुद्ध सत्ताधारी पक्ष असा संघर्ष पेटला

महापालिकेत आयुक्त विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शुक्रवारी झालेल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आयुक्तांना सत्ताधाऱ्यांनी धक्का देत कंपनीच्या सीईओपदावरून हटवले. कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने यांच्याकडे कार्यभार साेपवला आहे.

कंपनीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनीच आपल्याला मौखिकरित्या स्मार्ट सिटी कंपनीच्या ‘सीईओ’पदाचा कार्यभार सोपवल्याचा दावा करणाऱ्या आयुक्तांना अखेर पायउतार व्हावे लागले. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून सत्ताधाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक मनपा स्मार्ट सिटीच्या कार्यलयात पार पडली. संचालक मंडळात महापौर, सत्तापक्ष नेता, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, बसपा गटनेत्या, शिवसेनेचा एक सदस्य तसेच पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, नासुप्र सभापती, मनपा आयुक्त, केंद्र सरकारचे अपर सचिव (वित्त) दीपक कोचर यांचा समावेश आहे. तर स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीण परदेशी हे आहेत. शिवाय दोन स्वतंत्र संचालकांमध्ये नितीशकुमार व अनिरुद्ध सेनवाई यांचा समावेश आहे.

अध्यक्ष प्रवीण परदेशी व अपर सचिव दीपक कोचर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीच्या कामकाज पत्रिकेत स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकपदी आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करणे, तसेच कंपनीच्या सीईओ पदाच्या नियुक्तीसंदर्भात प्रस्ताव ठेवण्यात आले. महापालिका आयुक्त हे कंपनी संचालक असतात. त्याला संचालक मंडळाने मान्यता प्रदान केली, तर तुकाराम मुंढे यांनीही सीईओ पदाचा कार्यभार अन्य व्यक्तीकडे सोपवण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यावर काही संचालकांनी आक्षेप घेत मतदानाची मागणी केली. अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी मतदान घेण्याऐवजी सर्व संचालकांनी मते आपण जाणून घेऊ असे सांगितले. एचआर पॉलिसीनुसार निर्णय घ्यावा, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्यास उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे कार्यभार सोपवण्यात यावा, अशी तरतूद आहे. त्यानुसार महेश मोरोने यांना ही जबाबदारी देण्यात आली.

0