आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचऱ्यातून कमावण्याची योजना:जैविक कचऱ्यातून महापालिकेला चार वर्षात 14 कोटींचे उत्पन्न, अनधिकृत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

1 जानेवारी 2019 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत नागपूर महापालिकेला जैविक कचऱ्याची वाहतूक आणि विल्हेवाटीतून 14, 7,94,993 रूपयांचा महसूल मिळाला. यामध्ये 2019 मध्ये 34 लाख 40 हजार 695 रूपये तर 2020 ते 2022 या तीन वर्षांमध्ये प्रत्येकी 37 लाख 84 हजार 766 रूपयांचा महसूल मिळाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीत महापालिकेतंर्गत रोज अंदाजे 2157 जैववैद्यकीय कचरा उचलण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. रूग्णालयातून रोज 646 किलो, क्लिनिक 1010 व पॅथाॅलाॅजीतून 294 किलो कचऱ्याची उचल केली जाते.

नागपूर महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक अनधिकृतपणे जैविक कचरा टाकल्याबद्दल वेळोवेळी दंडात्मक कारवाई करते. पथकाने काही दिवसांतपूर्वीच एस. आर. लिमिटेड लॅबला बायो-मेडिकल कचरा सामान्य कचऱ्यासोबत अनधिकृत ठिकाणी टाकल्याबद्दल 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. नागपूर महापालिकेतंर्गत 2019 मध्ये 1417.505 मे. टन, 2020 मध्ये 1509.262 मे. टन, 2021 मध्ये 1350.035 मे. टन व 2022 मध्ये 0555.512 मे. टन जैव वैद्यकीय कचरा निघाला. महापालिकेने त्याची विल्हेवाट लावली. मात्र, भांडेवाडी येथे नेमका किती कचरा पडून आहे. याची माहिती देणे शक्य नसल्याचे नमूद केले.

शहरात सुमारे दोन हजारांहून अधिक रुग्णालये व वैद्यकीय संस्था नोंदणीकृत आहेत. यात पाचपेक्षा अधिक खाटा असलेली 750 रुग्णालये तसेच 231 पॅथॉलॉजी लॅब व काही खासगी रक्तपेढ्या आहेत. प्रत्येक वैद्यकीय संस्थेने महापालिकेकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. एकट्या मेडिकलमधूनच महिन्याकाठी पाच टनाच्या जवळपास कचरा गोळा होतो तर मेयो रुग्णालयात दरमहा सरासरी दीड हजार किलो घनकचरा तयार होतो. रुग्ण भरती असल्यास प्रत्येक खाटेमागे किमान 200 ग्रॅम घनकचरा तयार होतो. सरासरी काढली तर प्रत्येक रुग्णालयात महिन्याला सुमारे 50 ते 70 किलो जैववैद्यकीय कचरा संकलित होतो. सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीचे कामगार रुग्णालयातून कचरा संकलन करतात.

बातम्या आणखी आहेत...