आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळीव श्वानांची नोंदणी फी 200 ऐवजी 500:नसबंदी केल्यास मनपा 300 रुपये करणार परत; नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भटक्या कुत्र्यांचा उच्छाद रोखण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर नागपूर महापालिकेने कारवाई करणे सुरू केले आहे. नागरिकांनी पाळीव श्वानांची नोंदणी करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

पाळीव श्वानासाठी आवश्यक असलेल्या परवाना शुल्कात महापालिकेने 200 ऐवजी 500 रूपये वाढ केली आहे. मात्र पाळीव श्वानाची नसबंदी केल्यास त्यातील 300 रूपये परत करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर तीनपेक्षा कमी पाळीव प्राणी ठेवणाऱ्यांसाठी शेजाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र असलेली अट शिथिल करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे.

नव्या धोरणानुसार पाळीव कुत्र्यांची नोंदणी यापुढे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे करणे अनिवार्य आहे. मालकाने भारतीय श्वानांची नसबंदी केल्यास संबंधित श्वानासाठी भरलेले पूर्ण नोंदणी शुल्क माफ केले जाईल अशी माहिती उपायुक्त डाॅ. गजेंद्र महल्ले यांनी दिली. एखाद्याने बनावट प्रमाणपत्र सादर केल्यास 20 हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे. या शिवाय श्वानांच्या नोंदणीसाठी महापालिकेकडून जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहीरात प्रसिद्ध झाल्या नंतर तीन महिन्यात सर्व मालकांना त्यांच्याकडील पाळीव कुत्र्यांची नोंदणी करावी लागणार आहे. तीन महिन्यांनंतर नाेंदणी करणाऱ्यांना पाच रूपये प्रतिदिन दंड भरावा लागणार आहे.

टक्या श्वानांसंदर्भात काम करणाऱ्या संस्थांनी या श्वानांची जबाबदारी घ्यावी, अशाप्रकारचे आदेश उच्चन्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशांनंतर महापालिकेने श्वानांची नोंदणी करण्याचे काम सुरू केले आहे. स्वयंसेवी संस्थानी देखील यासंदर्भातील आवाहन करण्यास प्रारंभ केले आहे. श्वानांच्या नोंदणीसाठी त्यांचा अलीकडचा पासपोर्ट फोटो, निवासाचा दाखला, लसीकरण केल्याच्या दाखल्याची प्रत, श्वानांच्या मालकाचे आधार कार्ड, नोंदणीचा अर्ज अशी सगळी कागदपत्रे नागपूर महापालिकेकडे सादर करावयाची आहेत.

श्वानांची नोंदणी किंवा कारवाई करताना महापालिका अधिकाऱ्यांशी नागरिकांनी वाद घालू नये. आपल्या श्वानांची नोंदणी तातडीने करून घ्यावी. ही नोंदणी केल्याची पोचपावती देखील घ्यावी. नोंदणी अर्जासह स्वत:चा अर्जही जोडावा, असे आवाहन सेव्ह स्पीचलेस असोसिएशनच्या प्रमुख स्मिता मिरे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...