आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगार म्हणून हिणवल्याने प्रेयसीचा खून:कटरने गळा चिरत केली हत्या; प्रियकराला हिंगणघाटातून अटक

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीचा गळा चिरून खून करणाऱ्या प्रियकराला कोराडी पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री हिंगणघाटवरून अटक केली. त्याला न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सुरादेवी परिसरात शुक्रवारी एका 20 ते 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. याप्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली. तरुणीची गळा चिरुन हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघडकीस आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. अंकित यशवंत रंधेय (25, चिचोली, ता. सावनेर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकित रंधेय हा खापरखेड्यातील एका दुकानावर कामावर होता. त्याची मैत्री काजल (20) या युवतीशी झाली. ती एका नर्सिग महाविद्यालयात शिक्षण घेत होती. अंकित आणि काजल हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. प्रेयसीवर अंकित खूप खर्च करीत होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपूर्वी अंकितला कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो काजलचे पूर्वीप्रमाणे लाड पुरवत नव्हता. त्यामुळे दोघांत वाद होत होता. काजल त्याला भेटवस्तू मागत होती, तर अंकितकडे पैसे नसल्याने तो टाळाटाळ करीत होता. त्यामुळे काजलने त्याच्यासोबत दुरावा निर्माण केला होता.

जबर मारहाण केली

शुक्रवारी अंकितने काजलला फोन केला. तिला भेटायचे असल्याचे सांगितले. तिने त्याला भेटवस्तू आणली तरच भेटणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने मित्रांकडून पैसे घेऊन अंकितासाठी भेटवस्तू घेतली. काजल शुक्रवारी दुपारी घरून खापरखेड्याजवळील रेल्वेलाईनकडे सुरादेवी खदानजवळ भेटायला आली. तेथून दोघेही दुचाकी घेऊन जंगलात गेले. जंगलात त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने उद्या पुन्हा भेटायला येणार का, अशी विचारणा केली. त्यावर काजलने त्याला बेरोजगार म्हणून संबोधले तसेच पुन्हा भेटण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अंकितने तिला जबर मारहाण केली. कटरने तिचा गळा चिरला आणि तिचीच दुचाकी घेऊन पळून गेला.

पोलिसांनी केली अटक

शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली. शनिवारी सकाळी काही युवकांनी काजलची ओळख पटविली. त्यामुळे तिचा प्रियकर अंकितचा पोलिसांनी शोध घेतला. तो बेपत्ता असल्याचे कळताच पोलिसांनी त्याचा शोध घेतला. शनिवारी रात्री 12 वाजता हिंगणघाट बसस्थानकावर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली.

बातम्या आणखी आहेत...