आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ वादातून खून:शेजाऱ्यांच्या भांडणात पोलीस तक्रार, रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार करून केली हत्या; नागपूरातील घटना

नागपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याच्या रागातून कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. देवदर्शन उर्फ बाळू मेश्राम (वय 45) असे मृत युवकाचे नाव आहे. तर सूरज विलास बागडे असे मारेकऱ्याचे नाव आहे. नागपूरातील पिपळा फाटा परिसरातील न्यू नेहरुनगर परिसरात ही घटना शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली आहे.

बाळू मेश्राम यांचा उमरेड मार्गावरील शंकरपूर येथे कुक्कुटपालनचा व्यवसाय होता. त्यांच्या बाजूला आरोपी सुरज बागडे राहत होता. त्याला नेहमी दारूचे व्यसन होते. एके दिवशी बाळू मेश्राम यांनी सूरजच्या घरासमोर काही सामान ठेवले. त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्याचदरम्यान 'मी तुला मारून टाकेन' अशी ठार मारण्याची धमकी सूरज याने बाळू मेश्राम यांना दिली होती. त्यानंतर मेश्राम यांनी सूरज विरोधात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

आपल्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने सूरज हा बाळू यांच्यावर संतापला. शनिवारी दुपारी 3.30 दरम्यान त्याने दारू पिऊन बाळू यांची पत्नी सुलोचना व मुलगा यांना शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री बाळू मेश्राम आल्यानंतर त्यांच्या पत्नीने सदरील प्रकार त्यांना सांगितला.

सूरज याला समजवण्यासाठी बाळू गेले असता, त्याने शिवीगाळ करत कुऱ्हाडीने बाळू मेश्राम यांच्यावर सपासप वार केले. कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, बाळू यांच्या उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला आहे. सदरील प्रकरणातील आरोपी सूरज बागडे हा फरार असून, हुडकेश्वर पोलीस त्याचा शोध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...