आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नागपूर:दुचाकी पार्क करण्याच्या वादातून महिलेची सात वर्षीय मुलासमोरच हत्या, नागरिकांची बघ्याची भूमिका

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रहिवाशांची महिलेची मदत न करता केवळ बघ्याची भूमिका

वाहन पार्क करण्याच्या क्षुल्लक वादातून शेजाऱ्याने ३४ वर्षीय महिलेची तिच्या सात वर्षे वयाच्या मुलासमोरच चाकूने भोसकून हत्या केल्याची थरारक घटना नागपुरात नंदनवन परिसरात बुधवारी रात्री घडली. वस्तीतील अनेक लोकांच्या समक्ष हा प्रकार घडत असताना रहिवाशांनी महिलेची मदत न करता केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरती गिरडकर असे मृत महिलेचे नाव होते. गिरडकर कुटुंबाचा त्यांच्या शेजारी असलेल्या टापरे कुटुंबाशी अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. बुधवारी रात्री आरती यांनी दुचाकी पार्क केल्यावर टापरे कुटुंबाने घराजवळ गाडी उभी करण्यावर आक्षेप घेतला. या वेळी त्यांच्यासोबत सात वर्षांचा मुलगा होता.

वाद विकोपाला जाऊन एकनाथ ऊर्फ बंडू टापरे या युवकाने घरातील चाकू काढून आरती यांच्यावर हल्ला चढवला. आरती यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाव वर्मी लागल्याने आरती यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार सुरू असताना वस्तीतील लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी बंडू टापरे याला अटक केली असून चौकशी सुरू आहे.

0