आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:चंद्रपूरच्या मोरवा येथे पैशाच्या वादातून युवकाची हत्या

चंद्रपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाच्या व्यवहारातून एका युवकाला काही युवकांनी बेदम मारहाण करून त्याचे हातपाय दोरीने व पाठीवर मोठा दगड बांधून त्याला विहिरीत फेकून दिल्याची घटना गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा गावात घडली. यात त्या युवकाचा मृत्यू झाला. प्रवीण घिवे असे मृत युवकाचे नाव असून या प्रकरणी पडोली पोलिसांनी २ युवकांना ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रवीणकडून मारेकऱ्यांनी पैसे उसने घेतले होते. ते पैसे परत मागण्यासाठी प्रवीण गेला होता. त्यावरून त्यांच्यात वाद झाले व काही युवकांनी प्रवीणला मारहाण केली आणि त्याचे हातपाय दोरीने बांधून त्याच्या पाठीवर मोठा दगड बांधून विहिरीत फेकून दिले. यात प्रवीणचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पडोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पडोलीचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपास चक्रे फिरवली असता या खून प्रकरणी २ आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...