आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:प्रेमप्रकरणातून नागपुरात तरूणाचा खून, लागोपाठच्या दुसऱ्या घटनेने नागपुरात खळबळ

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • किशोर नंदनवार असे मृतकाचे नाव असून त्याचे आरोपी रिजवान खान याची मानलेली बहीण पायलशी प्रेमप्रकरण सुरू होते.

एकतर्फी प्रेमातून प्रेमिकेची आजी व भावाचा खून करून नंतर स्वत:ही आत्महत्या करणाऱ्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच तरूणीशी प्रेमसंबंध असलेल्या तरूणाचा तिच्या भावाने खून केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. किशोर नंदनवार असे मृतकाचे नाव असून त्याचे आरोपी रिजवान खान याची मानलेली बहीण पायलशी प्रेमप्रकरण सुरू होते.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर नंदनवार व रिझवान खान एकमेकांचे मित्र होते. रिझवान खानची मानलेली बहीण पायलची छेडखानी करीत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न किशोर नेहमी करीत असे. हे आवडत नसलेल्या पायलने याची रिजवानकडे तक्रार केली.

यावरून रिजवानने किशोरला अनेकदा समजावले. परंतु त्या नंतरही त्याने छेडखानी करून जवळीक साधणे बंद केले नाही. आपण सांगूनही किशोरचे छेडणे थांबत नसल्याने रिजवानने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याला शनिवारी सकाळी मांजरी अंडर ब्रिजच्या खाली भेटायला बोलावले. तिथे दोघांत पुन्हा वाद झाल्यानंतर रिजवानने किशोरला चाकूने भोसकले. पोलिसांनी त्याला एका खासगी हाॅस्पीटलमध्ये नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. व रिजवानला अटक केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser