आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:दारूविक्रीच्या वादातून युवकाची हत्या

नागपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारदार हत्याराने एका २२ वर्षीय युवकाची त्याच गावातील अल्पवयीन मुलाने हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री एमआयडीसी पोलिस स्टेशन अंतर्गत निलडोह या गावात घडली. चेतन अंकुश मोहर्ले (वय २२) असे मृतकाचे नाव आहे.

चेतनच्या नावाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात काही गुन्हे दाखल आहेत. या परिसरात तो अवैध दारू विक्री करायचा. तर अल्पवयीन आरोपीही अवैध दारू विक्री करायचा. घटनास्थळाच्या बाजूलाच अवैध दारू विक्रीचा गुत्ता आहे. बुधवारी रात्री मृतक व आरोपी यांच्यात दारूच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. यात आरोपीने स्वतः जवळील चाकूने व लोखंडी दांड्याने चेतनवर वार केले व तेथून फरार झाला. काही लोकांना चेतन जखमी अवस्थेत दिसला. पोलिसांना याची सूचना देण्यात दिली असून जखमीला तत्काळ नजीकच्या लता मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...