आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा:जावयाकडून सासऱ्याचा खून; मृतदेह कालव्यातून काढताना भावाचाही मृत्यू

भंडारा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीच्या चारित्र्याबाबत सासरच्या लोकांना अनेकदा समजावले, मात्र उलट सासरचे जावयालाच धमकी देत राहायचे. यातून संतापलेल्या जावयाने सासऱ्याचा खून करून मृतदेह गोसेखुर्द धरणाच्या कालव्यात फेकला.

मृतदेह काढण्यासाठी कालव्यात उतरलेल्या मृताच्या भावाचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना कोदुर्ली शिवारात घडली. हरी गोविंदा नागपुरे (६७) असे खून झालेल्या सासऱ्याचे नाव आहे, तर चंद्रभान गोविंदा नागपुरे (५७) असे मृताच्या भावाचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...