आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:पेट्रोल पंप बंद व्हावेत हीच माझी इच्छा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संपूर्ण देशभरात 35 लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील पेट्रोल व डिझेल पंप नाहीसे व्हावेत हीच माझी इच्छा असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मल्टिमाॅडल लॉजिस्टिक पार्कच्या सामंजस्य करारानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टिमाॅडल लॉजिस्टिक पार्कचा सामंजस्य करार एनएचएलएमएल व जेएनपीटी म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट यांच्यात झाला. हाॅटेल सेंटर पाॅइंट येथे झालेल्या कार्यक्रमात जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, एनएचएलएमएलचे सीईओ प्रकाश गौर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस आदी उपस्थित होते.

पेट्रोल-डिझेलचे वाढीव दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या बॅरलवर अवलंबून आहेत. परिणामी भाव वाढत आहेत. भविष्यात पेट्रोल पंप बंद व्हावेत हीच माझी इच्छा आहे. यावरील प्रभावी उपाय म्हणूनच इथेनाॅलसारखे पर्यायी इंधन आहे. इथेनॉल हे सर्वाधिक परवडणारे इंधन असून ते विमानातील इंधनासाठीही यशस्वी झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता पर्यायी इंधनाची गरज असून इथेनॉल, सीएनजी, बायो एलएनजी, इलेक्ट्रिक हे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. या इंधनाचा पर्याय सर्वांना स्वीकारावा लागणार आहे, असे नितीन गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

या वेळी सुनील केदार यांनी गडकरींची मुक्तकंठाने प्रशंसा केली. एकदा ‌‌ठरवले की गडकरी काम पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. ते स्वत: कधी स्वस्थ बसत नाहीत आणि इतरांनाही बसू देत नाहीत. सतत विकासाचा ध्यास घेऊन ते काम करतात असे केदार म्हणाले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी प्रश्न विचारले.

संपूर्ण देशभरात 35 लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार
तत्पूर्वी सामंजस्य करार समारंभात बोलताना गडकरींनी देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेले नागपूर लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित होणार असल्याचे सांगितले. संपूर्ण देशभरात ३५ लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. नागपूरनंतर जालना येथे काम सुरू झाले असून नाशिक, सोलापूर, सांगली येथे प्रयत्न सुरू असल्याचे गडकरींनी सांगितले. आपल्याला प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर व्हायचे आहे. उदबत्तीसाठी चीनहून बांबूची होणारी आयात थांबवली. आता वाराणसीहून बांबू आणता येतील, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...