आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शीतल आमटे आत्महत्या प्रकरण:डॉ. शीतल आमटे-करजगींच्या आत्महत्येचे गूढ कायम, लॅपटॉपसह जप्त केलेले साहित्य मुंबई फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शीतल आमटे यांच्या आत्महत्येच्या तपासात आता प्रगती होत आहे

कर्मयोगी बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवार, ३० नोव्हेंबरला विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. शीतल यांच्या आत्महत्येचे गूढ अजूनही कायम आहे. या आत्महत्येच्या धक्क्यातून आमटे कुटुंबीय अजूनही सावरलेले नाही. दिवंगत शीतल यांचे चुलतभाऊ अनिकेत आमटे यांच्याशी संपर्क साधला असता कुटुंबातील कोणीही बोलण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात डाॅ. शीतल यांचे सासु सासरे तसेच त्यांच्या पतीसह घरातील दोन महिला घरकामगारांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यांच्याकडून डाॅ. शीतल यांच्या ३० तारखेच्या दैनंदिनीची माहिती घेण्यात आली. उद्या गुरुवारी आणखी दोन ते तीन साक्षीदार तपासण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पांडे यांनी सांगितले. डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येच्या तपासात आता प्रगती होत आहे. दिवंगत शीतल यांच्या खोलीतून जप्त करण्यात आलेले लॅपटाॅपसह इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य पहिले नागपूर येथील न्यायसहायक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. डाॅ. शीतल यांनी मृत्यूपूर्वी केलेले मेसेजेस रिकव्हर करायचे होते. परंतु नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये यासंबंधीचा तज्ज्ञ नसल्याने हे सर्व साहित्य मुंबई येथील लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती वरोऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. निलेश पांडे यांनी दिली.

दरम्यान, शीतल यांचे सासरे शिरीष करजगी व सुहासिनी करजगी यांनी एक जाहीर पत्र समाजमाध्यमांवर पोस्ट करीत काही मिनिटातच डिलीट केले. तेवढ्या वेळातही या पत्रातील मजकुराची चर्चा झाली. शीतल करजगी यांच्या पतीने ही पोस्ट सुहासिनी करजगी यांनी लिहल्याची कबुली दिली आहे. आनंदवनातील अंतर्गत वाद व भेदभावाचा सामना करावा लागल्यामुळे शीतल या तणावात होत्या, असा आरोपही त्यांनी केला आहे.

शिरीष कराजगी यांनी लिहलेल्या पत्रात, समाजात घडणाऱ्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या आमटे कुटुंबातील मुलीला या पद्धतीने त्रास सहन करावा लागत असेल तर, समाजातील बाकी मुलींचे काय होत असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. शिवाय आनंदवनातील आरोप व कुटुंबातील अंतर्गत वाद हे ती सहन करु शकली नाही, असेही या पत्रात नमुद केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser