आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​​​​​​​संत्रानगरीचे बदलते रूप:देशातील एकमेव डबल डेकरचे ७५% काम पूर्ण, चारस्तरीय वाहतुकीस तयार

नागपूर (अतुल पेठकर)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागपुरातील डबल डेकर उड्डाणपूल जुलै २०२१ मध्ये तयार करण्याचे उद्दिष्ट

वर्धा मार्गा‌वरील उड्डाणपुलापेक्षाही मोठा डबल डेकर उड्डाणपूल कामठी मार्गावर तयार होत असून ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. याच मार्गावरील चारस्तरीय वाहतुकीसाठी १७०० मेट्रिक टन वजनाचे गर्डर पुण्यात तयार होत असून हे बसवणे मोठे आव्हान ठरणार आहे. कामाने गती घेतली असली तरी रेल्वेच्या परवानगीची प्रतीक्षा महामेट्रोला आहे. गर्डर बसवण्यासाठी रेल्वेला चार तासांचा ब्लॉक घ्यावा लागणार आहे.

अजनी ते हॉटेल प्राइडपर्यंत ३.१४ किलोमीटर लांबीच्या डबल डेकर उड्डाणपुलाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यापेक्षाही मोठा म्हणजे ५.३ किलोमीटर लांबीचा डबल डेकर उड्डाणपूल आहे. याच मार्गावरील सर्वांत आव्हानात्मक काम समजली जाणारी गड्डीगोदाम येथील चारस्तरीय वाहतुकीसाठी फॅब्रिकेशन स्टीलचे १०० मीटर लांब गर्डर तयार होत आहे. रेल्वेच्या ट्रॅकवरून उड्डाणपूल आणि त्यावरून मेट्रोचा मार्ग जाणार असून रेल्वेच्या परवानगीसाठी महामेट्रोकडून प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. परवानगीनंतर या कामाला गती येईल. ‘एनएचएआय’च्या ५८० कोटींंच्या या प्रकल्पावर आतापर्यंत ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. जुलै २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले असून डिसेंबर २०२१ मध्ये वाहतूक सुरू होईल, असा विश्वास महामेट्रोकडून व्यक्त करण्यात आला. गड्डीगोदाम चौकात उभे राहत असलेल्या पुलाचे गर्डर १७०० मेट्रिक टन असून हे मोठे आव्हान आहे.

तिसऱ्या स्तरावरील उड्डाणपूल चारपदरी वाहतुकीसाठी असेल. विविध भागांत जाणाऱ्यांसाठी खालून रस्ता मार्ग, त्यावर रेल्वेमार्ग, तिसऱ्या लेअरमध्ये शहराबाहेर जाणाऱ्यांसाठी रस्ता मार्ग असेल. सर्वात वर अर्थात टॉप लेअरवर मेट्रो धावणार आहे. मेट्रो रेल्वे जमिनीपासून तब्बल २६ मीटर उंचीवरून धावणार आहे युनिक स्ट्रक्टर राहणार आहे. साडेतीन किलोमीटरचे डबल डेकर स्ट्रक्चर तयार होत आहे. तिथे नॅशनल हायवेवर ऑर्गमेंटेर फ्लायओव्हर बनवणार आहे.

कल्पाची वैशिष्ट्ये व्हायडक्टचे 80% काम पूर्ण, स्टेशनचे 62% काम पूर्ण.

मेट्रो व्हायडक्टची सर्वात जास्त उंची गड्डी गोदाम येथील गुरुद्वाराजवळ असेल.

बातम्या आणखी आहेत...