आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार-दुचाकीचा उड्डाणपुलावर भीषण अपघात:दुचाकीसह चौघे जण पुलावरून खाली पडले; दोघांचा मृत्यू, नागपुरातील घटना

नागपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथील सक्करदरा उड्डाणपुलावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते चार ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त दुचाकीवरील चौघे जण पुलावरून सुमारे 70 ते 80 फूट खाली पडले.

शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका अनियंत्रीत कारने उड्डाणपुलावरून जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही दुचाकीवरील दुचाकीस्वार पुलावरून 70 ते 80 फुट खाली रस्त्यावर फेकले गेले. त्यात चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातात नेमके किती जण ठार झाले याची माहिती अजून मिळू शकलेली नाही.

गाडीला मागून धडक

दुसऱ्या एका घटनेत ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर रामदास मिसाळ (वय 52, हुडकेश्वर रोड) हे त्यांचे मामा दुष्यंत पुंडलिक लोहकरे (वय 60, पारडी) यांना एमएच 40, टी 8291 क्रमांकाच्या दुचाकीवर पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या जबलपूर हैद्राबाद सर्व्हीस रोडवरील पारस फुड कंपनी समोरून जात होते. त्यावेळी एमएच 12, एलटी 8292 क्रमाकांच्या ट्रकचालकाने मिसाळ यांच्या गाडीला मागून धडक दिली. यात त्यांचे मामा दुष्यंत यांचा तोल जाऊन ते पडले व ट्रकच्या मागच्या चाकात येऊन मृत्यू झाला. या प्रकरणी पारडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...