आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

G-20 परिषद:विदेशी पाहुण्यांना फिरण्यासाठी वातानुकूलित वाहनांची सोय, सी-20 परिषदेसाठी शहरात रोषनाई

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरमध्ये उद्यापासून (20 मार्च) जी-20 परिषदेअंतर्गत दोन दिवसीय सी-20 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विदेशी पाहुण्यांना आणि स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींना फिरण्यासाठी खास वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या आणण्यात आल्या आहेत. तसेच शहर जी -20 परिषदकसाठी नटले आहे.

रस्त्यावर रोषनाई

शहरात सिव्हिल लाईन भागासह वर्धा रोडवर रोषणाई करण्यात आली आहे. उद्या (20 मार्च) रोजी दुपारी 3 वाजता वर्धा रोडवरील हाॅटल रॅडीसन ब्ल्यू येथे परिषदेचे उद्घाटक माता अमृतानंदमयी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

या सी-20 मध्ये आरोग्य, रोजगार, कला, मानवाधिकार, सेवा आदि चौदा विषयांवर चर्चा होणार आहे. जागतिक जीडीपीच्या 85 टक्के, जागतिक व्यापाराच्या 75 टक्के आणि जागतिक लोकसंख्येच्या दोन तृतीयांश घटकांचे प्रतिनिधित्व जी-20 मध्ये केले जाणार आहे.

असे कार्य करते सी-20

सी-20 हा सामाजिक विकास, मानवी हक्क आणि लैंगिक समानता यासह विविध विषयांवर धोरणे आखण्यासाठी जी-20 ला शिफारशी प्रदान करणारा नागरी समाज संस्थांचा एक गट आहे. जगभरातील अशासकीय व सेवाभावी नागरी समाजसंस्थांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी सी-20 हे हक्काचे जागतिक व्यासपीठ आहे.

अपेक्षांचा पाठपुरवठा

सी-20 गट जागतिक चारित्र्य, पारदर्शकता, स्वातंत्र्य, सहयोग, मानवी हक्क, लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण, सर्वसमावेशकता, सातत्य आणि भविष्यसूचकता या तत्त्वांवर कार्य करतो. सी-20 चे मुख्य कार्य सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे आणि जागतिक आर्थिक धोरणे आखतांना त्यात नागरिकांच्या अपेक्षांचा पाठपुरावा करण्यासाठी शिफारशी करण्याचे आहे.

विदर्भातील 25 संस्थांचा सहभाग

जी-20 देशांच्या नागरी संस्थांचे जवळपास 60 प्रतिनिधी आणि भारतातील विविध नागरी संस्था व आमंत्रित देशांचे असे जवळपास 300 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी नागपूर व विदर्भातील जवळपास 1000 संस्थांनी अर्ज केले होते. यापैकी 25 संस्थांची या परिषदेत सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली आहे.