आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅकेट:दुबईमार्गे सोन्याची तस्करी करण्यासाठी नागपूर विमानतळ ठरतोय नवा अड्डा; पोलिसांनी केली तिघांना अटक

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ दुबईमार्गे सोने तस्करीचा नवा मार्ग ठरत आहे. नागपूर पोलिसांनी विमानतळावर पाळत ठेवून तिघांना पार्किंग लाॅटमधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही बॅगा जप्त करण्यात आल्या. या तिघांनी यापूर्वीच्या दरोड्यात टिपरचे काम केले होते.

कस्टम ड्यूटी वाचवण्यासाठी कामगारांचा उपयाेग अशा प्रकारे केला जात असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. शारजा, दुबई येथे मजुरीसाठी देशातून मोठ्या संख्येने मजूर तसेच कामगार जातात. यात राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कामगारांचाही समावेश आहे. सोने तस्करीसाठी प्रामुख्याने नागौरचे रॅकेट कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.

नागौरचे कामगार परतताना घेऊन येतात बॅगा, पार्किंग लॉटमध्ये होते अदलाबदली

दुबई व शारजा आदी ठिकाणी गेलेले नागौर येथील कामगार परत येताना मोठ्या बॅगा घेऊन येतात. या बॅगमध्ये घोंगडे तसेच लोखंडाच्या कांबी असतात. नागपूर विमानतळाच्या पार्किंग लाॅटमध्ये हे कामगार बॅगची अदलाबदली करतात. या कामगारांजवळ नागपूर विमानतळावर कुणाला बॅग द्यायची त्याचे छायाचित्र असते. तर घेणाऱ्याजवळ कामगाराचे छायाचित्र असते. हे छायाचित्र दाखवून ओळख पटवून बॅग दिली जाते. या बॅगेतील घोंगड्यांवर सोन्याचे पाणी मारलेले असण्याची शक्यता अमितेेशकुमार यांनी व्यक्त केली.

अमली पदार्थ रोखण्यासाठी नवा गुप्तचर सेल स्थापन करणार

नागपुरात अमली पदार्थ तस्करी तसेच आरोपी पकडण्याच्या घटनांतही वाढ झाली आहे. अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी लवकरच नवीन इंटेलिजन्स सेल स्थापन करण्यात येणार असल्याचेही पोलिस आयुक्तांनी सांगितले.

सात वर्षांत पाच कोटींचे सोने जप्त

विमानतळावर गेल्या सात वर्षांत तब्बल चार कोटी ९६ लाखांहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले. शिवाय शस्त्रे, मद्य, ड्रोन, सिगारेटही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत. सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांचे नागपूर विमानतळावर विशेषत: शारजा, दुबई येथून नागपुरात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष असते.

बातम्या आणखी आहेत...