आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्निंग बस:नागपूर-अमरावती शिवशाही बस पेटली; 20 जण बचावले

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - अमरावती महामार्गावर नागपूरहून अमरावतीला जाणाऱ्या शिवशाही बसने मंगळवारी सकाळी कोंढाळीजवळील साई मंदिराजवळ अचानक पेट घेतला. बसमधील चालकाने प्रसंगावधान राखून गाडीला ब्रेक लावत वेळीच प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठी जीवितहानी टळली.

वायरिंगमध्ये गडबड असल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्याने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. शिवशाही साई मंदिर जवळून अमरावतीच्या दिशेला जात होती. इंजिनमधून धूर निघत असल्याचे बघत गाडीचा चालक अब्दुल झहीर शेख यांनी बस रस्त्याच्या कडेला लावून लगेच ब्रेक दाबला. त्याने आरडाओरड करत वाहक (कंडक्टर) उज्ज्वल देशपांडे आणि प्रवाशांना माहिती दिले. त्यानंतर सर्व १६ प्रवासी सामान घेऊन पळत बसच्या बाहेर आले. प्रवासी उतरल्यावर क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले.