आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फौजदारी खटले:नागपूर बेंचने विजय वडेट्टीवारांना पाठवली नोटिस, पासपोर्ट बनविताना फौजदारी खटले लपविल्याचा आरोप

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च न्यायालयाने माजी विधान परिषद सदस्य मितेश बांगड़िया यांच्या याचिकेवर सुनावनी करत महाराष्ट्र सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांना कायदेशीर नोटिस पाठवली आहे. याचिकेत विजय वडेट्टीवारांवर नागपूरमधून पासपोर्ट बनविण्यासाछी दोनवेळी अर्ज देताना फौजदारी खटला लपविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती ए एस चंदुरकर आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने नोटिस जारी करुन चार आठवड्यात उत्तर मागितले आहे. 

हायकोर्टाच्या नागपूर पीठाने वडेट्टीवारांशिवाय राज्य गृह विभाग, नागपूर पोलिस आयुक्त आणि नागपूर आणि मुंबई पासपोर्ट कार्यालयालाही शुक्रवारी नोटिस जारी केली. माजी एमएलसी मितेश बांगड़िया यांनी आपल्या याचिकेत वडेट्टीवारांविर गुन्हा दाखल करुन त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली आहे.

वडेट्टीवारांवर 10 पेक्षा जास्त खटले लपवल्याचा आरोप

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे वडेट्टीवार महाविकास अघाड़ी सरकारमध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत. याचिकाकर्त्याने आपले वकील श्रीरंग भंडारकर यांच्याद्वारे म्हटले की, जेव्हा वडेट्टीवारांनी पहिल्यांदा मे 2001 मध्ये नागपूरमध्ये पासपोर्टसाठी अर्ज दिला होता, तेव्हा त्यांनी मुद्दामुन आपल्याविरोधातील खटले लपविले. याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, त्यावेळेस वडेट्टीवारांवर दहापेक्षा जास्त खटले होते.

दिशाभूल करण्याच्या हेतूने गोष्टी जाणीवपूर्वक लपविल्या

याचिकाकर्त्याने म्हटले की, वडेट्टीवारांनी पासपोर्ट मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक दिशाभूल केली. वडेट्टीवारांनी जानेवारी 2007 मध्ये दुसऱ्यांना पासपोर्टसाठी अर्ज दिला होता, पण यापूर्वी दिलेल्या अर्जाचा खुलासा केला नाही. याचिकेत म्हटले आहे की, दुसऱ्या अर्जावेळीही त्यांनी आपल्यावरील खटले लपविले.