आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. तसेच या ट्रेनच्या डब्यांची पाहणी केली आणि स्थानकावरील सोयी सुविधांचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकोमोटिव्ह इंजिनच्या नियंत्रण केंद्राची पाहणी केली आणि नागपूर, अजनी रेल्वे स्थानकांच्या विकास योजनांचा आढावाही घेतला. या रेल्वे सेवेमुळे नागपूर ते बिलासपूर प्रवासाची वेळ ७-८ तासांवरून ५ तास ३० मिनिटे एवढी कमी होईल.यावेळी पंतप्रधानांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते.ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल आणि प्रवासाचा आरामदायी आणि जलद मार्ग उपलब्ध होईल. नागपूर ते बिलासपूर प्रवासाची वेळ ५ तास ३० मिनिटे असेल. देशात दाखल होणारी ही सहावी वंदे भारत रेल्वे असेल आणि पूर्वीच्या तुलनेत ही प्रगत आवृत्ती आहे, ती खूपच हलकी आणि कमी कालावधीत जास्त वेगाने पोहोचण्यास सक्षम आहे. वंदे भारत २.० अधिक प्रगती आणि सुधारित वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे जसे की ० ते १०० किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त ५२ सेकंदात आणि कमाल वेग १८० किलोमीटर प्रति तासापर्यंत असेल. सुधारित वंदे भारत एक्सप्रेसचे वजन ३९२ टन असेल, जे आधी ४३० टन होते.वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन डिझाईनमध्ये, हवा शुद्धीकरणासाठी रूफ-माउंटेड पॅकेज युनिट मध्ये फोटो-उत्प्रेरक अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली स्थापित केली आहे. चंदिगडच्या सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रूमेंट्स ऑर्गनायझेशन शिफारसीनुसार, ताजी हवा आणि परतीच्या हवेतून येणारी जंतू, जीवाणू, विषाणू इत्यादीपासूनची मुक्त हवा फिल्टर आणि स्वच्छ करण्यासाठी ही प्रणाली आरएमपीयूच्या दोन्ही टोकांवर डिझाइन आणि स्थापित केली आहे. वंदे भारत एक्सप्रेस २.० उत्कृष्ट आणि विमानासारखा प्रवास अनुभव देते. ती प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे ज्यात स्वदेशी विकसित रेल्वे टक्कर टाळण्याची कवच प्रणाली समाविष्ट आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.