आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMW मधून झाडांची चोरी करणाऱ्या हायप्रोफाईल चोरांना अटक:जी-20 निमित्त शहरात सौंदर्यीकरण, पोलिसांची कारवाई

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर शहरात सी़-20 परिषदेची लगबग असताना BMW कारमधून झाडांची चोरी करणाऱ्या हायप्रोफाईल चोरांना गाडीसह पोलिसांनी अटक केली. 14 मार्च रोजी मध्यरात्री BMW मधून आलेल्या दोघांनी या झाडांची चोरी केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेत गुरूवारी रात्री ही कारवाई केली.

शहर सजले

सध्या नागपुरात सी-20 बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उपराजधानीला नववधूप्रमाणे सजवले जात आहे. सुशोभीकरणाच्या कामासोबतच विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक फुलझाडे आणि रोपेही लावण्यात येत आहेत. महामेट्रो वर्धा मार्गावरील संपूर्ण सौंदर्यीकरण करीत आहेत. मेट्रोचे खांब आकर्षक चित्रांनी रंगवण्यात येत आहे. सोबतच देशी विदेशी झाडे लावण्यात येत आहे. परिषदेचे स्थळ असलेल्या वर्धा मार्गाचा कायापालट करण्यात आला आहे.

पोलिसांची कारवाई

रस्ते दुभाजकावर सुंदर झाडे लावण्यात आली आहे. 14 मार्च रोजी (MH 01,BB 8296 ) क्रमाकांच्या बीएमडब्ल्यूमधून आलेल्या दोघांनी मध्यरात्री झाडांची चोरी केली. त्याचा व्हिडीओ 16 मार्च रोजी व्हायरल झाला. या प्रकारानंतर चांगलीच खळबळ माजली होती.

प्रताप नगर पोलिस ठाण्यात कार्यरत वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक शीतल तुकाराम चामले यांनी घटनेची तक्रार दाखल केली. सीसीटीव्हीत कारचा क्रमांक स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी क्रमाकांवरून आरटीओतून मालकाचा शोध घेतला. जय बजाज आणि जतीन नेव्हारे या दोघांना गुरूवारी रात्री उशिरा अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...