आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर राज्याला 5700 कोटींचा फायदा होईल:जुन्या विद्युत निर्मिती प्रकल्पांचा स्च्छ ऊर्जेसाठी वापर करण्याचा गरज; क्लायमेट रिस्क होरायझन्सचा निष्कर्ष

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि सर्वाधिक खर्चिक अशा कोळसाधारीत विद्युत निर्मिती प्रकल्पांचा वापर स्वच्छ ऊर्जेसाठी केल्यास बऱ्याच लाभदायक बाबी होऊ शकतात. यामध्ये प्रकल्पाची जमीन आणि कोळसाधारीत विद्युत निर्मितीच्या काही पायाभूत सुविधांचा वापर स्वच्छ ऊर्जा आणि ग्रिड स्थिरीकरण सेवांसाठी केल्यास 5,700 कोटी रुपयांचा लाभ होऊ शकतो. क्लायमेट रिस्क होरायझन्स या संशोधन संस्थेच्या माध्यमातून केलेल्या नव्या विश्लेषणातून हे दिसून आले आहे.

राज्यातील कोळसाधारीत जुनी विद्युत निर्मिती (4,020 मेगावॉट) केंद्रे बंद करणे आणि त्यांचा अन्य ऊर्जेसाठी वापर या कामातील खर्च आणि लाभ हे या अभ्यासद्वारे आकडेवारीनिशी मांडले आहेत. अशा प्रकारे खर्च आणि लाभाची आकडेवारीनिशी मांडणी प्रथमच करण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील ऑक्सफर्ड सस्टेनेबल फायनान्स ग्रुपच्या ट्रान्झिशन फायनान्स रिसर्चचे प्रमुख डॉ. गिरीश श्रीमली यांनी हा अभ्यास केला आहे.

“ऊर्जा स्थित्यंतरामध्ये महाराष्ट्र हे आधीपासूनच देशातील आघाडीचे राज्य आहे. जुने आणि अधिक खर्चिक असे कोळसाधारीत विद्युत प्रकल्प बंद करुन त्यांच्या जागेचा आणि पायाभूत सुविधांचा वापर स्वच्छ ऊर्जेसाठी केल्याने ऊर्जा स्थित्यंतरास वेग मिळण्यास चांगली आर्थिक संधी आहे. तसेच यामुळे राज्यास आर्थिकदृष्ट्या लाभ होईल,” असे क्लायमेट रिस्क होरायझन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष फर्नांडिस म्हणाले. हा अभ्यास क्लायमेट रिस्क होरायझन्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

अभ्यासात नमूद केलेल्या कोळासाधारीत विद्युत निर्मिती केंद्रांचा कार्यकाळ संपला आहे किंवा तो संपण्याच्या नजिक आहे. ही केंद्रे सुरु ठेवण्यासाठी प्रति किलोवॉट सुमारे सहा रुपये इतका मोठा खर्च होत आहे. उत्सर्जनाचे प्रमाण सुसंगत राहण्यासाठी हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या साधनसामग्रीसह त्यांना रिट्रोफिट (वायू उत्सर्जनाचे मानक पूर्ण करण्याच्या दृष्टीने बदल) करण्याची गरज असून हा खर्च बराच जास्त असल्याचे त्यांनी नमुद केले.

नमुद केल्यापैकी काही किंवा सर्व कोळसाधारीत विद्युत निर्मिती प्रकल्पांचा वापर स्वच्छ ऊर्जेसाठी केल्यास होणारा आर्थिक लाभ, हे प्रकल्प बंद करण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा दोन ते चार पटींनी अधिक असेल. तसेच यामुळे सौर ऊर्जा निर्मिती, बॅटरीज आणि सिन्क्रोनस कन्डेसर्स यासाठीचा भांडवली खर्च लक्षणीय प्रमाणात उपलब्ध होईल, असे डॉ. गिरिश श्रीमली म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...