आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना परिस्थिती बिकट असताना नागपूरमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नागपुरात कोरोनाचे ५ नवीन स्ट्रेन सापडले आहेत. दिल्लीहून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३५ नमुन्यांमध्ये हे नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. सर्दी, खोकला, ताप, अतिसार अशी या नव्या स्ट्रेनची प्रमुख लक्षणे आहेत.
नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि नागपूर शासकीय वैद्यकीय विद्यालयात आलेल्या संशयित रुग्णाचे हे नमुने एनअायव्ही आणि दिल्लीच्या एनसीडीसीला पाठवण्यात आले होते. याचा अहवाल आला असून, यामध्ये ७४ पैकी ३५ नमुन्यांमध्ये ५ वेगवेगळ्या प्रकारचे म्युटेशन असल्याचे समोर आले आहे. यातील २६ नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन असल्याचे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र खडसे यांनी म्हटले आहे. नव्या म्युटेशनमध्ये कोरोनानंतरच्या प्रतिकारशक्तीचाही उपयोग होत नसल्याचे दिसून आले आहे.
डबल म्युटेशन अधिक घातक
डबल म्युटेशन म्हणजे एकाच जीन्समध्ये दोन पद्धतीने बदल झालेले आहेत. हे मानवासाठी अधिक घातक ठरू शकतात. जर पूर्वी कोरोना झाला असेल आणि त्याने कोरोनावर मात केल्यास त्याच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते. मात्र नवीन म्युटेशनमध्ये या रोग प्रतिकारशक्तीचा फायदा होत नसल्याने पुन्हा कोरोना होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.