आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Nagpur Corona Outbreak; Climate Activist Vijay Limaye Provide Services From The House To The Crematorium For The Funeral In Nagpur; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूरचे खांदेकरी:नागपुरात खांदा देण्यासाठी माणसं मिळेना; आता अंत्यसंस्कारासाठी खांदेकरी, घरापासून स्मशानापर्यंत देतील सेवा

नागपूर21 दिवसांपूर्वीलेखक: अतुल पेठकर
  • कॉपी लिंक
  • पर्यावरणवादी कार्यकर्ते विजय लिमये यांचा पुढाकार

कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव अजून कोणते दशावतार दाखवेल माहिती नाही. कोरोनाने माणूसकीचे सरण रचले आहे. अशातच नागपुरात अंत्यसंस्कारासाठी माणसं मिळत नाही. दरम्यान, नागपूर येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते विजय लिमये यांनी पुढाकार घेतला आहे. लिमये यांनी घरपासून ते स्मशानात जाळण्यापर्यत मदत करण्यासाठी चार खादेकऱ्याची व्यवस्था केली आहे. नागपुरात कोरोनामुळे रोज 80 ते 100 लोकांचा मृत्यू होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी वर्तमानपत्रात दोन-तीनच्यावर निधन वार्ता येत नसत. परंतु, आता वर्तमानपत्रांतील अर्धे पान या बातम्यांमुळे झळाळून निघत आहेत.

कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तीवर महापालिका प्रशासनाकडून अंत्यसंस्कार केल्या जाते. पण भीती आणि दहशतीमुळे नैसर्गिक मरण आल्यानंतरही खांदेकरी मिळत नाही. हे लक्षात घेऊन पर्यावरण कार्यकर्ते विजय लिमये यांनी स्वर्खाने चार खांदेकऱ्याची व्यवस्था केली आहे. लिमये यांनी पुढे बोलताना सांगितले की, हे खांदेकरी मृतकांच्या घरापासून तर स्मशानापर्य अंत्यसंस्कारासाठी मदत करतील. विसाव्या नंतर सर्व सोपस्कार पार पाडतील आणि नंतर घरी जातील, असे लिमये यांनी सांगितले. यामुळे आपल्या आप्ताचा अंत्यसंस्कार नीट पार पडल्याचे समाधान लोकांना मिळेल.

कोण आहेत विजय लिमये?

पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनचे विजय लिमये यांना पर्याणवरपूरक अंत्यसंस्काराचे प्रणेते असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी त्यांनी एक चळवळ सुरू केली. केवळ नागपूरच नव्हे, तर विदर्भात आणि नाशिक, पुण्यासह सांगली अशा विविध शहरांमध्ये जाऊन ते पर्यावरणपूरक अंत्यविधीसाठी मार्गदर्शन करत असतात. स्थानिक संस्था आणि संघटनांकडून त्यांना बोलावले जाते. अशात ते एका मृतदेहावर पर्यावरणपूरक अंत्यविधी करून त्यांनाही हे काम शिकवतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही त्यांनी अशीच कामे केली आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेसाठी त्यांच्या संस्थेकडून एकही पैसा घेतला जात नाही.

कसा होतो पर्यावरणपूरक अंत्यविधी

अंत्यविधीसाठी लाकूड जाळल्याने पर्यावरणाला हानी होऊ शकते. त्यामुळे विजय लिमये अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर करत नाहीत. अशा पद्धतीने एका अंत्यविधीसाठी ते झाडे वाचवतातच त्यात पर्यावरणाला नुकसानही होऊ देत नाही. लाकडांना पर्याय म्हणून ते गोकाष्ठ किंवा मोक्षकाष्ठ अशा विशिष्ठ विटांचा वापर करतात. मोक्षकाष्ठ या विटा शेतकऱ्यांकडून फेकून किंवा जाळून दिल्या जाणाऱ्या तुराटींचा किंवा शेतीतील टाकाऊ कचऱ्याचा वापर करून तयार केल्या जातात. यासाठी शेतकऱ्यांकडून ते 5 ते 6 रुपये किलोने विकत घेतले जाते. तर गोकाष्ठ हे गवऱ्यांपासून बनवले जाते. गवऱ्यांमुळे महिलांना रोजगारही मिळतो.

बातम्या आणखी आहेत...