आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकाचा मृतदेह दुसऱ्यालाच दिला अशा घटना अनेकदा घडताना दिसत आहेत. असाच प्रत्यय नुकताच नागपुरात एका कुटुंबीयांना आला. तुमच्या नातेवाइकाचा मृत्यू झाला असून मृतदेह घेऊन जा, असा रुग्णालयातून फोन आला. मात्र, प्रत्यक्षात मृतदेह दुसऱ्याचा दिला. नातेवाइकांनी ज्या ठिकाणी आपल्या रुग्णाला दाखल केले होते तिथे जाऊन पाहिले असता त्यांचा रुग्ण बेडवर दिसल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. हा सावळागोंधळ शनिवारी नागपूर येथील वर्धा रोडवरील डोंगरगाव येथील ‘गायकवाड पाटील कोविडालय’ येथे उघडकीस आला. याप्रकरणी संतप्त नातेवाइकांनी हिंगणा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
रुग्णाचे नातेवाईक मनोज लिहितकर म्हणाले, त्यांची ६३ वर्षीय मावशी आशा मून या शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्या. कुटुंबात हा आजार पसरू नये म्हणून त्यांना डोंगरगाव येथील कोविड सेंटरमध्ये भरती केले. शनिवारी कोविड सेंटरमधून फोन आला. त्यात आशा मून यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले.त्यानंतर सर्व जण रुग्णालयात गेले. तेथील कर्मचाऱ्यांनी आशा यांच्या नावाचे मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. बॅगमध्ये असलेला मृतदेह आपला नसल्याचे दिसताच नातेवाइकांनी मून यांना जिथे ठेवले होते तिथे धाव घेतली. तर आशा मून आपल्या रुग्णालयातील बेडवर बसून होत्या. त्यानंतर एकच धांदल उडाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.