आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलॉन मांजाने मुलीचा कापला गळा:उपचार सुरू, नागपुरातील घटना; गळ्याला तब्बल 26 टाके पडल्याची माहिती

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे एका मुलीचा गळा कापला गेल्याची घटना शुक्रवारी नागपुर येथील फारूक नगर भागात घडली. या घटनेत मुलगी बचावली असून, तिला तब्बल 26 टाके पडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे प्राणघातक नायलॉन मांजाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी रस्त्यावर खेळत असताना तिचा नॉयलॉन मांजाने गळा कापला गेला आहे. आणि मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. मांजाल्या बंदी असताना सुद्धा शहरात पंतगं विक्रेत्यांकडून नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. आता यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मांज्याची सर्रास विक्री

संक्राती जवळ आली असून मांजा आणि पतंग विक्रीचा बाजार सजला आहे. सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. दुकानासमोर दुसरा मांजा विक्रीला ठेवला जातो. ग्राहकाने इशारा केल्यास हवा तेवढा नायलॉन मांजा मागच्या दाराने उपलब्ध करून दिला जात आहे. या मांजाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...