आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्याच्या बहाण्याने होमिओपॅथी डॉक्टरला साडेचार कोटींनी गंडा घालण्यासह मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने अनेकांना सुमारे 20 ते 25 कोटींनी चूना लावणारा कथित सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे सध्या दवाखान्यात उपचार घेत आहे. पारसेची दवाखान्यातच चौकशी करून 8 फेब्रुवारीपर्यत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्या नंतर पारसेने दोन रुग्णालये बदलली आहे, हे विशेष.
यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 11 जि. पी. देशमुख यांनी आरोपीविरुध्द प्रत्यक्ष सहभाग आणि रक्कमे बाबत देवाण घेवाण दिसत असल्यामुळे पारसेचा जामीन अर्ज खारीज व्हावा ही सरकार पक्षाची बाजू ग्राह्य धरुन आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला होता.
डाॅ. राजेश मुरकुटे यांना मेडीकल कॅालेजची परवानगी प्राप्त करुन देतो, त्याच प्रमाणे सिबीआयकडून चौकशी सुरु असल्याचे बनावट सूचनापत्र तसेच बँकेची बनावट कागदपत्रे
व्हाॅटसअॅपवर टाकून विश्वास संपादन करुन वेळोवेळी 4,36,50,000 रुपयाची फसवणूक केली. तक्रारी वरुन आरोपी अजित पारसेविरुध्द कलम 84, 420, 465, 467, 468, 471 भा.द.वि. नुसार पोलीस स्टेशन कोतवाली येथे गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
अजित पारसे यांच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली असता राजमुद्रा असलेले शिक्के, पोलीस, बॅक, पोलीस स्टेशन, आयकर विभागाचे शिक्के, तसेच शासकीय कार्यालयाचे बनावट सिल व शिक्के व सापडले होते.
पारसेची न थांबणारी मागणी पुरवता येणे शक्य नसल्याने होमिओपॅथी डाॅक्टरने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केल्याने सोशल मीडिया विश्लेषकाच्या आड असलेला लुटारू चेहरा समोर आला होता.
याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये सोशल मीडिया विश्लेषक व सायबर तज्ज्ञ अजित गुणवंत पारसे (वय 42 भेंडे ले-आऊट) यांच्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 मध्ये होमीओपॅथी डाॅक्टर असलेल्या राजेश मुरकुटे यांची नातेवाईकाच्या माध्यमातून पारसेंसोबत ओळख झाली. होमिओपॅथी कॉलेज सुरू करायचे असल्याचे डॉक्टरने पारसेला सांगितले. पंतप्रधान कार्यालयात ओळख असून, कॉलेज सुरू करण्यासाठी तुम्हाला ट्रस्ट स्थापन करावा लागेल, असे पारसेने सांगितले. त्यानंतर त्यांनी ट्रस्टसाठी चार नावे सूचवली. यापैकी एक नाव नीती आयोगातर्फे आपल्याला मिळू शकते. तसेच सीएसआरअंतर्गत निधीही मिळूवन देण्याचे आमिष त्याने डॉक्टरला दाखविले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.