आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपुरातून बनावट नोटांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाजारात बनावट नोट्यांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित व्यक्ती 500 रुपयांची बनावट नोट देऊन 20 रुपयांचा नाश्ता करायचा व उरलेले सुटे पैसे घेऊन जायचा. एका खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
असा प्रकार उघडकीस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय गोलाईत हा मंगळवारी शम्मी गुप्ता यांच्या नाश्ता पाॅइंटवर नेहमी जायचा. नेहमी प्रमाणेच 22 नोव्हेंबर रोजी नाश्ता केल्यानंतर त्याने पाचशेची नोट दिली. आठवड्यानंतर विजयने पुन्हा पाचशेची नोट दिली. तर 6 डिसेंबरलाही नाश्ता केल्यानंतर विजयने पाचशेची नोट दिल्या नंतर गुप्ता यांना संशय आल्याने त्यांनी नोट तपासली असता बनावट असल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच विजयला पकडून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता बनावट नोटांचा प्रकार उघडकीस आला. त्या नंतर पोलिसांनी त्याला काल रात्री अटक केली.
असा अडकला जाळ्यात
पोलिसांनी विजयच्या घराची झडती घेतली असता घरात दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा मोठा साठा सापडला. जवळपास 10 ते 15 लाख रुपये किंमतीच्या नोटा असण्याची शक्यता आहे. विजय एका झेराॅक्सवाल्याकडून कलर प्रिंटर आणि स्कॅनरच्या सहाय्याने दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करीत होता.
बनावट नोटा छापण्याचा धंदा
विजय गोलाईत हा सदरमधील एका व्यापाऱ्याच्या घरी नोकर म्हणून काम करताे. श्रीमंत होण्याच्या नादात त्याने बनावट नोटा छापण्याचे ठरवले. त्याने एका झेराॅक्सवाल्याच्या मदतीने कलर प्रिंटर आणि स्कॅनर विकत घेऊन तयारी केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी नोटा स्कॅन करून बनावट नोटा बनविण्याचा प्रयत्न केला.
10-15 लाख रुपयांच्या बनावट नोटा
मात्र, सुरुवातीला नोटा जमल्या नाही. प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी विजयला यश आले. सुरुवातीला पाचशेच्या नोटा बनविल्या आणि दुकानात चालवल्या. अनेक दुकानदारांनी त्या बनावट नोटा स्वीकारल्या आणि वस्तू दिल्या. त्यामुळे दोघांचाही आत्मविश्वास वाढला. त्यामुळे दोघांनी दोन हजार रुपयांच्या नोटा बनवणे सुरू केले. घरीच उद्योग करीत त्यांनी 10 ते 15 लाख रुपयांच्या बनावट नोटा छापल्या.
विजय आणि झेराॅक्सवाल्याने यु-ट्यूबवरून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर बरेच दिवस सराव केला. दोघेही हुबेहूब नोटा तयार करायला लागले. त्या नोटांद्वारे किराणा, नाश्ता, रोजचा खर्च, धान्य आदी भागवायला लागले. त्यामुळे आरोपींचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर दोघांनीही बनावट नोटा छापण्याचा सपाटा सुरू केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.