आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात विकृतीचा कळस:मादी श्वानावर हातमजुराकडून बलात्कार; पोलिसांनी घेतले ताब्यात, गुन्हा दाखल

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलात्काराच्या घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आपण पाहातो. आजोबाने नातवावर, वडिलांनी मुलीवर, काकाने पुतणीवर बलात्कार केल्याच्या घटना आपण नेहमी वाचतो. पण, नागपूर येथील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाने कुत्रीवरच बलात्कार केल्याचे विचित्र प्रकरणे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्यात या प्रकरणी भादंवि कलम 294, 377 तसेच पशुक्रुरता कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार देवेंद्र गणपत भगत (वय 40) हा शिवम ट्रेडर्सच्या समोरील मोकळ्या जागेत, शाहू नगर चौक, मानेवाडा बेसा रोड, हुडकेश्वर या ठिकाणी राहतो. व तेथेच हातमजुरीचे काम करतो. तो मूळचा मध्य प्रदेेशातील बालाघाट जिल्ह्यातील कोथूलना येथील रहिवासी आहे. बेसा येथील बगिच्यात फिरणाऱ्या एका कुत्रीवर देवेंद्र भगत याने बलात्कार केला.

पुण्यातही घडली होती घटना

यापूर्वीही राज्यात कुत्रीवर बलात्काराच्या घटना घडल्या आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यांत 29 ऑगस्ट 2022 रोजी घटना घडल्या आहे. खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात प्रतीक टाकळकर या 28 वर्षीय व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

प्रतिक टाकळकरच्या तक्रारीनुसार, आरोपी भिवसेन टाकळकर यांनी घरी मादी श्वान पाळली होती. तिला घरात घेऊन आरोपी दार बंद करुन घ्यायचा आणि थोड्या वेळाने बाहेर सोडायचा. त्यानंतर तो आरोपीवर लक्ष ठेवू लागला. त्यानंतर परत असा प्रकार लक्षात आल्यावर त्याने दाराच्या चौकटीतून पाहिल्यावर आरोपी त्या श्वानासोबत लैंगिक कृती करत असल्याचे लक्षात आले होते.

बातम्या आणखी आहेत...