आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2023 हे वर्ष केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. राज्य सरकारही शेतकऱ्यांना ज्वारी, बाजरी, मका लावण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. अशात कडधान्य लावणाऱ्या शेतकऱ्यांची पेरणी ते कापणीपर्यतची कामे राेजगार हमी योजनेतून करून द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
1960-61 मध्ये अमरावती विभागाचे रब्बी आणि खरीप ज्वारीचे क्षेत्र 9295.0 हेक्टर इतके होते. ते 2020-21 मध्ये 315.32 हेक्टर इतके कमी झाले. तर नागपूर विभागाचे रब्बी आणि खरीप ज्वारीचे क्षेत्र 1960-61 मध्ये 5890 हेक्टर तर 2020-21 मध्ये 113.58 इतके कमी झाले होते. एकेकाळी विदर्भात शेतकरी खरीप हंगामात 40 टक्के ज्वारी बाजरीचे पिक घेत होते. आता केंद्राने आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष घोषीत केल्या नंतर पुन्हा ज्वारी, बाजरीचा पेरा वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
विदर्भातील संपलेला ज्वारी, बाजरीचा पेरा वाढवण्यासाठी यासाठी प्रति एकर अनुदान देण्याची जूनीच मागणी आहे. 30 जून 2006 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग वर्धा जिल्ह्यात आले असता आम्ही त्यांच्याकडेही ज्वारी, बाजरीसाठी प्रति एकर अनुदानाची मागणी केली होती. या शिवाय पेरणी ते कापणीपर्यतची कामे रोहयोतून करायला फडणवीसांनी यापूर्वी मान्यता दिली होती. मात्र सत्तेत येताच त्यांना याचा विसर पडला.
विचार करता राज्यातील खरीप हंगामातील पिकांखालील क्षेत्र या प्रमाणे कंसातील आकडे (2020-21 चे) 1960-61 मध्ये तांदुळाखाली 1300 हेक्टर (1472.6) क्षेत्र होते. ज्वारी 2549 (378.7), बाजरी 1635 (687.5), रागी 230 (81.6), इतर 217 (37) हेक्टर इतका होता. 1960-61 मध्ये मुग आणि उडीदाची पेरणीच नव्हती. तर तुर 530 (1339.63) हेक्टरवर पेरणी होती. त्याच प्रमाणे 1960-61 मध्ये सूर्यफुल आणि साेयाबीनची लागवड नव्हती. तर 20-21 मध्ये सूर्यफुल 19.2 हेक्टर तर सोयाबीन 4289.7 हेक्टरवर लागवड होती. दर वर्षी सोयाबीन वाढत आहे.
असे असते प्रथिनांचे प्रमाण
या पौष्टिक तृणधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण साधारणतः 7 ते 12 %, स्निग्ध पदार्थ 2 ते 5 %, पिष्टमय पदार्थ 65 ते 75 % व आहारातील तंतूमय पदार्थ 15 ते 20 % आढळतात. याचबरोबर जीवनसत्व व खनिजे जसे कॅल्शियम, लोह, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे व मानवी आरोग्यास उपयुक्त घटक विपुल प्रमाणात आढळत असून ही तृणधान्ये ग्लुटेन प्रोटीन मुक्त आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.