आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Nagpur Fire Broke Out While Setting Fire To A Dead Body In A Cemetery 3 Injured | Three People Who Took Part In The Exodus Suffered Burns And Were Admitted To The Hospital For Treatment

स्मशानभूमीत मृतदेहाला अग्नी देताना उडाला भडका:अत्यंयात्रेत सहभागी झालेले तिघे जण भाजले, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंत्यसंस्कार करताना अग्नी देत असताना उडालेल्या भडक्याने या अंत्ययात्रेत सहभागी झालेले तिघे जण भाजल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत गुरुवार 28 रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार 28 रोजी दुपारी तीन वाजता सुमारास कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम येथे घडलेल्या घटनेतील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपुरला हलविण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार स्थानिक मोदी पडाव नागसेन नगर येथील रहिवासी सिद्धार्थ अंतुजी हुमने यांचा अपघाती मृत्यू झाल्याने गुरुवारी दुपारी कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यावेळी प्रेताला अग्नी देत असताना टेंभा लावून डिझेलचा भडका उडाल्याने कार्यक्रमात सहभागी झालेले सुधीर महादेव डोंगरे (45), सुधाकर बुधाजी खोब्रागडे (60, दोघेही राहणार नागसेन नगर कामठी) व दिलीप घनश्याम गजभिये (60 रा. न्यू खलाशी लाईन कामठी) तिघे जण भाजल्याने गंभीर जखमी झाले. त्यावेळी उपस्थितांची एकच धावपळ उडाली.

उपचारासाठी रुग्णालयात

नागरिकांनी लगेच त्यांना उपचारार्थ कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता यातील सुधीर डोंगरे व दिलीप गजभिये यांची परिस्थिती नाजूक असल्याने यांना नागपुरच्या मेयो रुग्णालयात हलविण्यात आले तर अन्य जखमी सुधाकर खोब्रागडे यांच्यावर कामठीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...