आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात अभिरुप जी़-20 परिषद संपन्न:विद्यार्थ्यांनी गजबजला जिल्हा परिषदेचा परिसर, 140 जण सहभागी

नागपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी-20 परिषदेविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेत आज (10 मार्च) रोजी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली अभिरुप जी-20 परिषद घेण्यात आली. नागपुरच्या खेडकर सभागृहात ही परिषद घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहात 140 देशांच्या प्रतिनिधींचे प्रतिनिधीत्व केले.

अभिरुप जी-20 साठी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोक्कडे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंगळवार (7 मार्च) आणि गुरूवार (9 मार्च) रोजी जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात अभिरुप जी-20 ची रंगीत तालिम झाली. जी-20 परिषदेसाठी जिल्ह्यातील दोन शासकीय, चार ग्रामीण, आठ निमशासकीय आणि सहा खाजगी अशा एकूण 20 शाळांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेचे सात विद्यार्थी असे एकूण 140 विद्यार्थी या अभिरुप जी-20 मध्ये सहभागी झाले होते. 10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सभागृहात झालेल्या अभिरुप जी-20 परिषदेसाठी मुलांचा उत्साह ओसंडून वाहात होता.

विद्यार्थ्यांची भाषणे

प्रत्येक शाळेतून निवड झालेल्या सात विद्यार्थ्यांनी अभिरुप जी-20 मध्ये वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधीत्व केले. यातील एका विद्यार्थ्याने जी-20 परिषदेच्या सदस्य देशाच्या राष्ट्राध्यक्ष, प्रधानमंत्री यांच्या वेशात ‘शाश्वत विकासात नागरी संस्थांची भूमिका’ विषयावर पाच मिनिटांचे संबोधन केले. याशिवाय सदस्य देशाचे नाम फलक, ध्वजवाहक म्हणून दोन विद्यार्थी सहभागी झाले होते तर उर्वरित चार विद्यार्थी प्रत्यक्ष सभागृहात संबंधित देशाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...