आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर जिल्ह्यात जी-20 साठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना सांबर वडी, झुणक्यासह अस्सल वऱ्हाडी चमचमीत पदार्थांची मेजवानी देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या गोंधळ आणि लावणीसह शास्त्रीय संगीताच्या जुगलबंदीचाही आनंद लुटता येणार आहे.
भारतात सी-20 निमित्त नागपुरात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या भोजनाची जबाबदारी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 20 मार्च रोजी रात्री 8 वाजता तेलंगखेडी गार्डन येथे पाहुण्यांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आणि सुग्रास, स्वादिष्ट आणि रूचकर भोजन ठेवण्यात आले आहे. यात कॉन्टिनेन्टल, अस्सल वऱ्हाडी, दक्षिण भारतीय पदार्थ असणार आहेत.
चटकदार मेजवानी
विदेशी पाहुण्यांना स्वागत पेय म्हणून अंबाडी सरबत, आम पान, सोल कढीसह सॉफ्ट ड्रिंक्स - कोक/मिरिंडा/माझा देण्यात येईल. तर सूप व्हेजमध्ये टोमॅटो सार, लिंबू धणे/ गरम आणि आंबट आंबिल असेल.
मांसाहारी सुपमध्ये पाय्या सूप, स्वीट कॉर्न चिकन सूप / चिकन क्लियर सूप राहिल. स्टार्टर्समध्ये पनीर टिक्का, कुरकुरीत व्हेज, मिनी आलूबोंडा व हुरडा तर मांसाहारी स्टार्टर्समध्ये चिली चिकन, फिश फिंगर व भुना मटण राहाणार आहे.
वऱ्हाडी झुणक्यासह दक्षिणेतीलही पदार्थ
पाहुण्यांना अस्सल वऱ्हाडी जेवणासोबत दाक्षिणात्य पदार्थही असणार आहेत. शाकाहारी जेवणात सांबर वडी, पाटोदीरस्सा भाजी, झुणका, वांगेभरित, पनीर बटर मसाला, मसाला भात + साधाभात, ताक/मठ्ठा, आमटीचा समावेश आहे. तर मांसाहारात चिकन करी, सावजी अंडाकरी, फिश करी राहिल. रोटीमध्ये तवा रोटी, तंदूरी रोटी, नान, मटका रोटी तसेच ज्वारी/बाजरीची भाकरी असेल. या शिवाय दक्षिण भारतीय पदार्थ, बेक व्हेज, ब्रुशेटा, व्हेज कॅनेलोनी, मोझ्झेरेला रोल्स राइस हे कॉन्टिनेन्टल पदार्थ राहाणार आहे.
गोंधळ-लावणीचे सादरीकरण
20 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता पाहुणे फुटाळा येथे संगीत कारंजाचा खेळ पाहाणार आहेत. तिथून ते तेलंगखेडी बगिचात येतील. बगिच्यात गोंधळ, लावणी व चिटकोर हे कार्यक्रम होणार आहे. महिलांसाठी मोगरा आणि चमेलीच्या गजऱ्याचे स्टाॅल राहाणार आहे. या शिवाय महिलांसाठी मेहंदी आर्टिस्टही राहाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली. फुटाळ्यावर पाहुण्यांसाठी फटाका शोचे आयोजन केले आहे.
पाहुण्यांना देणार 'या' भेटवस्तू
१९ मार्च रोजी सायंकाळी पाहुण्यांचे विमानतळावर आगमन होणार आहे. पाहुण्यांना गुलाबी फेटा बांधून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाणार आहे. या शिवाय खास तयार करून घेतलेले भंडारा मलबेरी सिल्कचे स्टाेल भेट म्हणून देण्यात येणार आहे. या स्टोलवर इंग्रजी आणि मराठीत जी-२० व सी-२० असे लिहिलेले आहे. पाहुण्यांना संत्रा ज्यूस आणि संत्रा बर्फीही भेट दिली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.