आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1958 नंतर भाजपच्या गडाला सुरुंग:संघभूमीत उमेदवार पराभूत झाल्याने भाजपला हादरे, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा नागपुरात दणदणीत विजय

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसचे विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांनी घेतले सहकुटुंब गणेश टेकडीचे दर्शन - Divya Marathi
काँग्रेसचे विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांनी घेतले सहकुटुंब गणेश टेकडीचे दर्शन
  • 1958 पासून हा गड भाजपच्या ताब्यात होत्या. नागपुरात भाजपचे मुख्यालय असल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपचे मुख्यालय असलेल्या नागपुरात उमेदवार पराभूत झाल्याने भाजपला हादरा बसला आहे. 1958 नंतर पहिल्यांदाच भाजप गड ढासळला आहे. नागपूर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

1958 पासून होता भाजपचा बालेकिल्ला
नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड आहे. येथे महाविकास आघाडीने भाजपच्या गडाला सुरुंग लावला आहे. 1958 पासून हा गड भाजपच्या ताब्यात होत्या. केंद्र वा राज्यात कुठेही पक्षाची सत्ता नव्हती, तेव्हाही पक्षाचे उमेदवार विजयी झाले. नागपुरात भाजपचे मुख्यालय असल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या आधिपासुन हा गड भाजपच्या ताब्यात होता. 1958 मध्ये पंडीत बच्छराज व्यास हे जनसंघाचे नेते होते. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपकडे होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर राव फडणवीस हे देखील येथून निवडून आले होते. केंद्रीय मंत्री गडकरीही सलग चार वेळा निवडून आले. एकदा त्यांनी सर्वाधिक विक्रम केला. ते अविरोध निवडूण आले. प्रा. अनिल सोले यांनी पदवीधर मतदार संघात विजयाची पताका कायम राखली. हे संघाचे मुख्यालय आहे. येथे पराभव होणे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत
अभिजीत वंजारी ५५ हजार ९४७, संदीप जोशी ४१ हजार ५४०, राजेंद्रकुमार चौधरी २३३, इंजीनियर राहुल वानखेडे ३ हजार ७५२, ॲङ सुनिता पाटील २०७, अतुलकुमार खोब्रागडे ८ हजार ४९९, अमित मेश्राम ५८, प्रशांत डेकाटे १ हजार ५१८, नितीन रोंघे ५२२, नितेश कराळे ६ हजार ८८९, डॉ. प्रकाश रामटेके १८९, बबन तायवाडे ८८, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ६१, सी.ए. राजेंद्र भुतडा १ हजार ५३७, प्रा.डॉ. विनोद राऊत १७४, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ६६, शरद जीवतोडे ३७, प्रा.संगीता बढे १२० आणि इंजीनियर संजय नासरे ५६ मते पडली आहेत. प्रत्येक फेरीत २८ हजार मतांची मोजणी होत होती. तथापि, पाचव्या फेरीमध्ये उर्वरित २१ हजार ५३ मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत एकूण वैध मते १ लक्ष २१ हजार ४९३ ठरली. ११ हजार ५६० मते अवैध ठरली.

विधान परिषद निवडणुकीत अभिजित वंजारी निवडून आले आहेत. औपचारिक घोषणा बाकी आहे. थोड्याच वेळात प्रमाणपत्र घ्यायला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser