आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे प्रारंभापासून आघाडीवर होते. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे बंडखोर अजय भाेयर यांना लक्षणीय मते मिळाली आहेत.
भोयर यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची उमेदवारी मागितलेली असतानाही त्यांना डावलून गाणार उभे राहिल्याने भोयर यांनी बंडखोरी केली आहे. आता भोयर यांची ही बंडखोरी भाजपच्या नागो गाणारांना भोवण्याची चिन्हे आहेत.
एकूण २८ टेबलवर मतमोजणी सुरू आहे. प्रत्येक टेबलवरील उमेदवाराच्या खोक्यात त्यांच्या त्यांच्या नावाच्या मतपत्रिका टाकण्यात आल्या. त्यात आडबाले यांच्या खोक्यात सर्वाधिक मतपत्रिका होत्या. ३४, ३६० बॅलेट पैकी पहिल्या २८ हजार बॅलेटची मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित मोजणी सुरू आहे. थोड्याच वेळात वेळात अनिश्चित स्वरूपाच्या (डाऊटफूल ) मतपत्रिकांची तपासणी सुरू होईल. त्यानंतर वैध मते व त्यानंतर कोटा ठरणार आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत घोळ घालीत अखेर काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यांच्या समर्थनार्थ नेत्यांनी सभाही घेतल्या. यामुळे दोन टर्म या मतदारसंघातून आमदार राहिलेले नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले या तिघांत थेट लढत राहिल असे चित्र होते. मात्र, प्रत्यक्षात आडबाले व गाणार यांच्यातच लढत असल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत शिक्षक भारती, शिक्षक परिषद, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, वंचित बहुजन आघाडीने उमेदवार रिंगणात होते. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, वंचित बहुजन आघाडीचे दीपराज खोब्रागडे हे दखलपात्र उमेदवार होते. राष्ट्रवादीचे सतीश ईटकेलवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कयम ठेवली. मात्र, बंडखोरी केल्याबद्दल ईटकेलवार यांना पक्षातून निलंबित केले होते. या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे डाॅ. देवेंद्र वानखेडे हेही रिंगणात होते. त्यातच गाणारांना पक्षातंर्गत नाराजीचा सामना करावा लागत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.