आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हाच्या वाढलेल्या काहिलीमुळे नागपूर महानगरपालिकेने दुपारच्या सत्रात भरणाऱ्या शाळा आता सकाळी भरवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरमध्ये उन्हाचा चटका वाढल्याने हा निर्णय घेतला आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेने हिट अॅक्शन प्लॅन तयार केल्याचे आयुक्त बी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
पुढील 4-5 दिवसात महाराष्ट्राच्या काही भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. पंजाब, हरियाणा राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या भागात सरासरी तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. महाराष्ट्रातही आता उन्हाचा चटका वाढला आहे. सरासरी तापमानात 2 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने उष्मा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
उद्याने उघडी ठेवणार
नागपूर महानगरपालिकेने हिट अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार महापालिकेचे सर्व रुग्णालय सज्ज ठेवण्यात येणार आहे. सर्व्हे करुन उष्णतेची झळ पोहोचणाऱ्या वस्त्यांना आणि तेथील नागरिकांचा शोध घेऊन त्यानुसार नागपूर महानगरपालिकेकडून ओआरएचचा पुरवठा केला जाणार आहे. सोबतच शहरातील उद्याने दुपारी पण उघडी ठेवण्यात येतील.
काळजी घेण्याचे आवाहन
महापालिका गरजेनुसार काही भागात नागरिकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी शेड नेट तयार करणार आहे. हिट ऍक्शन प्लॅन तयार करताना पालिकेने यंदा व्हीजीएनआयटी आणि हवामान विभागाची मदत घेतली आहे. उन्हाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन यांनी केले आहे.
पावसाचा अंदाज
दरम्यान, पुढील दोन दिवस कमाल तापमान राज्यात कायम राहणार आहे. त्यानंतर त्यात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तुरळक पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.