आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा, राज्याचे आदीवासी मंत्री विजयकुमार गावीत, समाजसेविका टीना अंबानी अशा अनेकांनी नागपूर येथे आयोजित भारतीय विज्ञान परिषदेकडे पाठ फिरवली. त्याची चर्चा आयोजनस्थळी सुरू होती.
नागपुरचे असूनही चिल्ड्रेन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनाला नितीन गडकरी आले नाही. एकूण 10 नोबेल पारितोषिक विजेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांनी येण्यासाठी अनुकूलता दर्शवली. पाचपैकी दोघांनी येणे कन्फर्म केले. आणि प्रत्यक्षात एक नोबेल पारितोषिक विजेती आली
दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन
साधारणपणे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटनाला पंतप्रधान स्वतः उपस्थित राहातात. पण, नागपूर येथे मोदींनी स्वत: न येता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले. उद्घाटन कार्यक्रमाला आलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
विज्ञान सोडून सारे पारंपरिक
कहर झाला तो महिला विज्ञान काँग्रेसमध्ये. याच्या उद्घाटनाला टिना अंबानी आल्याच नाही. कांचन गडकरी आणि राहीबाई पोपेरे या फक्त उपस्थित होत्या. 15 जानेवारीचा संक्रातीचा मुहूर्त चुकेल म्हणून आधीच हळदी कुंकु घेऊन तिळाचे लाडू वाटण्यात आले. विज्ञानासंबंधी एकही ठराव पारित करण्यात आला नाही. विज्ञान सोडून सारे काही पारंपरिक कार्यक्रम याठिकाणी झाले.
वैज्ञानिकांच्या जेवणाची आबाळ
सर्वात आबाळ झाली ती जेवणाची. लग्नात जेवण संपल्याच्या घटना नवीन नाही. पण आयएससीमध्ये जेवण संपल्याच्या घटना घडल्याने अनेक संशाेधक, वैज्ञानिकांना उपाशी राहावे लागले. कधी प्लेट नव्हत्या तर तर कधी जेवण संपून जात असे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर इस्रोच्या कर्मचाऱ्यांनाही प्लेट घेऊन फिरावे लागले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.