आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Nagpur Is Becoming The New Hub Of Gold Smuggling Through Dubai Airport Smuggling, Information Of Police Commissioner; Three People Were Arrested In A Similar Crime

नागपूर ठरतेय दुबईमार्गे सोने तस्करीचा नवा अड्डा:विमानतळावरून तस्करी, पोलिस आयुक्तांची माहिती; अशाच प्रकारच्या गुन्ह्यात तिघांना अटक

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ दुबईमार्गे सोने तस्करीचा नवा मार्ग ठरत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. नागपूर पोलिसांनी विमानतळावर पाळत ठेवून तिघांना पार्कींग लाॅटमधून ताब्यात घेतल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. या तिघांनी यापूर्वीच्या दरोड्यात टिपरचे काम केले होते. कस्टम ड्यूटी वाचविण्यासाठी कामगारांचा उपयाेग अशाप्रकारे केला जातो.

शारजा, दुबई येथे मजूरी करण्यासाठी येथे संपूर्ण राज्यातून तसेच देशातून मोठ्या संख्येने मजूर तसेच कामगार जातात. यात राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कामगारांचाही समावेश आहे. सोने तस्करीसाठी प्रामुख्याने नागौरचे रॅकेट कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.

असे आणले जाते सोने

दुबई व शारजा आदी ठिकाणी गेलेले नागौर येथील कामगार परत येताना मोठ्या बॅगा घेऊन येतात. या बॅगांमध्ये घोंगडे तसेच लोखंडाच्या कांबी असतात. नागपूर विमानतळाच्या पार्कींग लाॅटमध्ये हे कामगार बॅगांची अदलाबदली करतात. या कामगारांजवळ नागपूर विमानतळावर कोणाला बॅग द्यायची त्याचे छायाचित्र असते. तर घेणाऱ्याजवळ कामगाराचे छायाचित्र असते. हे छायाचित्र दाखवून ओळख पटवून बॅग दिली जाते. या बॅगेतील घोंगड्यांवर सोन्याचे पाणी मारलेले असण्याची शक्यता अमितेश कुमार यांनी व्यक्त केली.

अंमली पदार्थ रोखण्यासाठी नवा सेल

नागपुरात अंमली पदार्थ तस्करी तसेच आरोपी पकडण्याच्या घटनांतही वाढ झाली आहे हे खरे आहे. अलिकडे या घटनांमध्ये वाढ होत आहे. अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी लवकरच नवीन इंटेलिजन्स सेल स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिस आयुक्तांनी दिली.

विमानतळावर गेल्या सात वर्षांत तब्बल चार कोटी ९६ लाखांहून अधिक किंमतीचे सोने जप्त करण्यात आले. शिवाय शस्त्रे, मद्य, ड्रोन, सिगारेटही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहे. सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांचे नागपूर विमानतळावर विशेषत: शारजहा, दुबई येथून नागपुरात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष असते. या दोन्ही ठिकाणावरून प्रवासी शरीरात सोने लपवून आणतात. सीमा शुल्क चुकवण्यासाठी असे प्रकार घडतात.

बातम्या आणखी आहेत...