आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Nagpur Jaytala Murder Case Update | 3 Person Arrester | Betel Nut Was Given To The Lover's Husband Who Was An Obstacle In The Relationship

जयताळ्यातील खुनाच्या तपासात धक्कादायक खुलासा:संबंधात अडसर ठरणाऱ्या प्रेमिकेच्या पतीची प्रियकरानेच दिली सुपारी

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जयताळा परिसरात घडलेल्या हत्याकांडाच्या तपासात खळबळजनक खुलासा झाला आहे. प्रतापनगर पोलिसांनी या खुनाचा तपास करून सत्य उजेडात आणले. संबंधात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीची प्रियकराने सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी प्रियकरासह तिघांना अटक केली. या हत्याकांडात पत्नीलाही आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुनील बाहेकर, खुमेश दमाहे आणि रोहित नागपुरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजराज रामेश्वर डोमडे (वय 30, पन्नासे लेआउट, सोनेगाव) आणि ममता (वय 25) यांनी सहा वर्षांपूर्वी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह झाला होता. गोंदियातील आमगाव येथून दोघेही कामाच्या शोधात नागपुरात आले होते. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. त्यांना 5 वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांची मुलगी आहे. भोजराज हा सेंट्रींगच्या कामावर जात होता. यादरम्यान, त्याचा मित्र सुनील बाहेकर याच्याशी ओळख झाली. दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. यादरम्यान सुनीलची नजर ममतावर पडली. दोघांची मैत्री झाल्यानंतर सूत जुळले.

पती प्रेमात अडसर

दोघांचेही प्रेमप्रकरण सुरू होते. भोजराज कामावर गेल्यानंतर सुनील त्याच्या घरी येत होता. याची कुणकुण भोजराजला लागली होती. त्यामुळे त्याने पत्नीची समजूत घातली होती. गेल्या तीन महिन्यांपूर्वी भोजराज कामावरून अचानक घरी परतला. घरात त्याला सुनील आणि पत्नी दोघेही नको त्या अवस्थेत दिसले. त्यामुळे त्याने सुनीलला मारहाण करीत त्याच्याशी मैत्री तोडली होती. ममता आणि सुनील एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. परंतु, पती भोजराज हा त्यांच्या प्रेमात अडसर ठरत होता. सुनीलने भोजराजची भेट घेऊन माफी मागत प्रकरण मिटविण्याची विनंती केली. तेव्हापासून घरातील वातावरण निवळले होते.

प्रियकराने दिली सुपारी

भोजराजचा काटा काढण्याचा सुनीलने कट रचला. त्याने ममताकडून पतीबद्दल माहिती घेतली. त्याने आरोपी खुमेश दमाहे आणि रोहित नागपूरे यांना 15 हजार रुपयांत सुपारी दिली. तसेच खून करण्यात मदत करण्याचे आश्वासनही दिले. कटानुसार, रात्री दहा वाजता भोजराजला दारू पाजण्याच्या बहाण्याने जयताळ्यात नेले. तेथे तिघांनी दगडाने ठेचून भोजराजचा खून केला. नाल्याच्या पाईपमध्ये मृतदेह लपून ठेवला. सोमवारी सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले.

ममताच्या सीडीआरमधून तपास

पती बेपत्ता झाल्यानंतर पत्नी ममताच्या वागणुकीवर पोलिसांना संशय आला होता. त्यामुळे पोलिसांनी ममताच्या मोबाईलचा ‘सीडीआर’ काढला. त्यामध्ये पतीच्या बेपत्ता होण्याच्या वेळेत प्रियकर सुनीलशी वारंवार संपर्कात होता. ठाणेदार दीपक भिताडे यांनी हाच धागा पकडून हत्याकांडाचा छडा लावत तिघांना अटक केली.

बातम्या आणखी आहेत...