आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक मतदारसंघ निवडणूक:124 मतदान केंद्रांवर 39 हजार मतदार करतील मतदान, सहा जिल्ह्यांमध्ये अशी आहे मतदारांची संख्या

नागपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी येत्या 30 जानेवारीला सहा जिल्ह्यांत 124 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. नागपूर विभागात एकूण 39 हजार 604 शिक्षक मतदार असून यात 16 हजार 702 महिला तर 22 हजार 704 पुरुष मतदारांचा समावेश आहे.

भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर 2022 रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमधून एकूण 22 उमेदवार निवडणूक लढणार आहेत.

नागपूर विभागात 124 मतदान केंद्र

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये 124 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान केंद्राबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून 31 डिसेंबर 2022 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात 43 मतदान केंद्र, वर्धा जिल्ह्यात 14, भंडारा जिल्ह्यात 12, गोंदिया जिल्ह्यात 10, चंद्रपूर जिल्ह्यात 27 तर गडचिरोली जिल्ह्यात 18 मतदान केंद्र आहेत.

39 हजार 406 मतदार

नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांमध्ये 10 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत शिक्षक मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. 2017 मध्ये नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघातील मतदारांची एकूण संख्या 35 हजार 9 होती तर 2022 अखेर ही संख्या वाढून 39 हजार 406 झाली आहे. यात 22 हजार 704 पुरुष तर 16 हजार 702 महिला मतदारांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय मतदारांची संख्या

नागपूर जिल्ह्यातील शिक्षक मतदारांची एकूण संख्या 16 हजार 480 आहे. यात 9 हजार 256 महिला तर 7 हजार 224 पुरुष मतदार आहेत. वर्धा जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 4 हजार 894 असून यात 2 हजार 962 महिला तर 1 हजार 932 पुरुष मतदारांचा समावेश आहे.

भंडारा जिल्ह्यात एकूण 3 हजार 797 मतदार आहेत. यात 1 हजार 225 महिला तर 2 हजार 572 पुरुष मतदार आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण 3 हजार 881 मतदार असून यात 1 हजार 218 महिला तर 2 हजार 663 पुरुष मतदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 7 हजार 571 मतदार आहेत. यात 2 हजार 684 महिला तर 4 हजार 887 पुरुष मतदार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण 3 हजार 211 मतदार असून यात 630 महिला आणि 2 हजार 581 पुरुष मतदार आहेत.

बातम्या आणखी आहेत...